पीक विम्यातून शेतकर्‍यांना भूलथापा

0
15
तिरोडा : सरकार शेतकर्‍यांना भूलथापा देत आहे. पिक विमा योजनेचा खूप प्रचार केला जात आहे. विमा खाजगी कंपनी काढत आहेत, ती कंपनी सहजासहजी विमा लागू करून शेतकर्‍यांना पैसे देत नाही. यातून केवळ शेतकर्‍यांना भुलथापा देण्याचे काम होत असल्याचा आरोप खा.प्रफुल्ल पटेल यांनी केला.
येथे आयोजित दिवाळी मिलन समारोहात ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी खा.पटेल म्हणाले, धापेवाडा टप्पा-२ केव्हा पूर्ण करणार, धापेवाडाचे पाणी शेतकर्‍यांना कधी मिळणार? अदानी प्रकल्पात ३३00मेगावॉट वीज निर्माण होऊ शकते.परंतु सरकारच्या मागणीअभावी अदानी प्लांटमध्ये कमी विद्युत निर्मिती करावी लागत आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांना २४ तास विज पुरवठा मिळत नाही. साडेपाच हजार कोटी रस्त्याचे भूमिपूजन झाले, पण रस्ते केव्हा बनणार, बेरोजगारी, महागाई वाढत चालली आहे. हेच आले का तुमचे अच्छे दिन? असा सवाल पटेलांनी केला.
शेतकर्‍यांचे धानपिकावरील प्रश्नावर माजी आ. दिलीप बंसोड यांनी आपल्या प्रास्ताविकातून प्रकाश टाकला. धानपिकाच्या भावापासून शेतकर्‍यांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे बोनस देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी डॉ. अविनाश जायस्वाल व मान्यवरांनी यथोचित मार्गदर्शन केले.