छोटा गोंदियातील ओबीसी जनजागरण मेळाव्याला प्रतिसाद

0
13

गोदिया,दि.25: ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदिया जिल्हा, ओबीसी सेवा संघ, गोंदिया जिल्हा व राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने छोटा गोंदियातील विठ्ठल रुखमाई मंदिर परिसरात ओबीसी जनजागरण मेळावा बुधवारी २३ नोव्हेंबर रोजी पार पडला.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे होते.मार्गदर्शक म्हणून कार्याध्यक्ष अमर वराडे,ओबीसी संघर्ष कृती समितीचे निमंत्रक मार्गदर्शक व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रसिध्दी प्रमुख खेमेंद्र कटरे,महासचिव मनोज मेंढे,शिशीर कटरे,उपाध्यक्ष कैलाश भेलावे, तिर्थराज उके, ओबीसी शिक्षक आघाडीचे प्रमुख एस.यु.वजांरी, ओबीसी सेवा संघाचे गोरेगाव तालुकाध्यक्ष प्रा.डाॅ.संजीव रहागंडाले, कार्यकर्ते झनक कटरे, जियालाल पटले, ओमकार मदनकर, दिलीप कटरे उपस्थित होते.यावेळी 8 डिसेंबरच्या महामोर्च्यात ओबीसी बांधवाना आपल्या सवैधांनीक अधिकारासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.आजपर्यंत सर्वानीच आपल्या ओबीसींची दिशाभूल केल्याने आत्तातरी आपल्या हक्कासाठी पेटून उठा असे आवाहन करण्यात आले.यावेळी परिसरातील 300 च्यावर ओबीसी महिला पुुरुष,विद्यार्थी मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी झाले होते. संचालन व प्रास्ताविक तिर्थराज उके यांनी केले. आभार ओबीसी संघर्ष कृती समितीचे शहर अध्यक्ष विष्णू नागरीकर, संतोष पटले यांनी मानले. कायक्रमासाठी विष्णू नागरीकर, दिलीप कटरे, मानिक कटरे, अशोक बिसेन, किसन भगत, संतोष पटले, देवराम बिसेन, राकेश टेंभरे, रामनाथ बिसेन, गोपाल बनकर, भोजू राऊत, देवा शेंडे, रमेश बागडे, ताकेश पहिरे, संतोष रहांगडाले, लुकेशकुमार पटले आदींनी सहकार्य केले.