बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ साठी जळगाव व उस्मानाबाद जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार

0
8

नवी दिल्ली, 24 – ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानाची उत्कृष्ट अमलबजावणी करण्यासाठी महाष्ट्रातील जळगाव व उस्मानाबाद जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल आणि उस्मानाबाद चे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ अभियानाचा दूसरा वर्धापन दिन तसेच ‘राष्ट्रीय बालिका दिना’चे औचित्य साधून येथील प्रवासी भारतीय केंद्रात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी, महिला व बाल विकास सचिव लीना नायर, रिओ पॅरा ऑलम्पिक विजेत्या दीपा मलिक, फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी, पद्श्री गिर्यारोहक अरुनिमा सिन्हा, गिर्यारोहक रेखा चोकन या मंचावर उपस्थित होत्या. यासह दिल्लीस्थित शाळेकरी विद्यार्थ्यांनी, महिला व मुलींसाठी कार्यरत गैरसरकारी संस्था, अंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत संस्थांचे प्रतिनिधी मोठया प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ अभियानातंर्गत देशभरातील 10 जिल्ह्यांना पुरस्कृत करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील जळगाव व उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.