कचारगडावर उद्या होणार कोया पुनेम महोत्सवाला सुरूवात

0
27

सालेकसा दि. 7 -: कचारगड येथील मॉ कंकाली देवस्थानात उद्या बुधवार, ८ फेब्रुवारीपासून कोया पुनेम महोत्सवाला सुरूवात होत आहे. देशभरातील आदिवासी बांधव या यात्रेत सहभागी होवून ‘कोपार लिंगो’ चा गजर करणार आहेत.या महोत्सवाला गड जागरण तथा पेन पुजेला गोंडीधर्माचार्य तथा गोंडी पुनेम प्रवचनकार तिरूमाल प्रेमसिंग दादा सल्लाम हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. ९ फेब्रुवारीला १२ वाजता राष्ट्रीय गोंडवाना महासंमेलनाचे उद््घाटन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंब्रिश आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले छत्तीसगढचे बस्तर विकास प्राधिकरण मंत्री भोजराज नाग, खा.अशोक नेते व अन्य पाहुणे उपस्थित राहणार आहेत. १0 फेब्रुवारी कोया पुनेम रॅली ११ वाजता निघेलतर १२ कोया पुनेम महासंमेलनाचे उद््घाटन केंद्रीय जनजाती कल्याणमंत्री ज्युएल ओरॉव यांच्या हस्ते गोंडवाना गोंड महासभेचे राष्ट्रिय अध्यक्ष एस.पी.सोरी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री फगनसिंग कुलस्ते, कर्नाटकचे डॉ.के.एम.मैत्री, क्रिष्णा गोंड, देवसिंह सयाम, रघुविरसिंह मार्को उपस्थित राहणार आहेत. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता गोंड महासभा होणार आहे. सभेचे उद््घाटन जनजाती आयोगाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा अनुसया उईके यांच्या हस्ते गुरूचरण नायक यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार नामदेव उसेंडी, दिपक आत्राम, रामरतनबापू राऊत हे उपस्थित राहणार आहेत. १२ रोजी महासंमेलनाचा समारोप होईल. तेव्हा कोया पुनेम महोत्सवाला जिल्ह्यातील आदिवासी बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन दुर्गाप्रसाद ककोडे, रमनलाल सलाम, संतोष पंधरे, बारेलाल वरकडे, मनिषराम पुसाम,रामेश्‍वर पंधरे, शकुंतलाबाई परते,सुरेश परते यांनी केले आहे.