काळविटांच्या माध्यमातून दहेगाव होतेय पर्यटन केंद्र

0
15

गोंदिया,berartimes.com दि. १६ – गोंदिया जिल्हा हा वन व निसर्गसंपन्नतेने भरभराटीस आलेला जिल्हा.परंतु निसर्गसंपदा असतानाही जो विकास पर्यटनाच्या माध्यमातून व्हायला हवा तो न झाल्याने संधी राहूनही पर्यटन जिल्हा म्हणून ओळख तयार करण्यात अपयशी ठरलेल्या जिल्ह्याला नवेगाव -नागझिरा व्याघ्र प्रकल्पासोबतच इटियाडोह धरण,हाजरॉफाल,बोदलकसा,कचारगडसारख्या पर्यटनस्थळाच्या रांगेत आत्ता दहेगाव हे गाव येऊन बसले आहे.ते सुध्दा राजस्थानात ज्या काळविटच्या शिकारीमुळे अभिनेता सलमान खान प्रसिध्दीस आला त्या काळविटचा हा क्षेत्र पर्यटकांसाठी आत्ता हळूहळू खुला होऊ लागला आहे.
गोंदिया शहरापासून अवघ्या १२ किलोमीटरवर गोंदिया,आमगाव व गोरेगाव तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या दहेगाव(मानेगाव)या ठिकाणच्या जंगलपरिसरात १८० हून अधिक काळविटांचे सरक्षंण त्या परिसरातील ग्रामवनसरंक्षण समितीसह वन्यप्रेमींनी केल्याने काळविट बघण्यासाठी पर्यटकांची हळूहळू आगमन होऊ लागले आहे.गोंदिया-आमगाव राज्यमार्गावर हे निसर्ग पर्यटन स्थळ असल्याने पर्यटकांनाही कुठे भटकण्याची वेळ येत नाही.
गोंदिया जिल्हा हा काळविट वन्यप्राण्यासाठी महत्वाचा आहे.जंगलपरिसर आणि याच परिसराला लागून असलेले खुल्या माळरानामुळे काळविटांंना मुक्त संचार करता येते. वन्यप्रेमी व वनाधिकाèयांच्या सकारात्मक पुढाकाराने माळरानावर काळविटांसाठी कुरण वाढविण्याचे काम सातत्याने सुरु राहिल्यानेच या भागात त्यांच्या संख्येत वाढ होऊ शकली.सन २००४-०५ यावर्षी गोंदिया जिल्ह्यात काळविटांची संख्या २० ते २५ च्या दरम्यान होती. परंतु ती संख्या आता १५० ते १८० च्यावर पोचली आहे.काळविट संवर्धनासाठी वनविभागाबरोबर निसर्ग मंडळ,सेवा संस्थेने काम केल्यानेच जिल्ह्यात ५ ठिकाणी काळविटांचे अधिवास टिकून आहे.या परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वॉच टॉवर,सोलर पंप,नैसर्गिक तलावांची बांधणी,काळविटासह इतर वन्यप्राण्याकरीता पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नाल्यावर बंधारे तयार करण्यात आले असून पर्यटकासांठी मचाण आणि माळरानावरील गवताच्या झोपड्या सुध्दा तयार करुन स्थानिक युवकांच्या माध्यमातूनच या नव्या पर्यटनस्थळाला नावारुपास आणण्याचे काम विवेक मानकर,प्रेम मरसकोल्हे,खुमेश भलावी,निलेश मानकर,विजय मानकर,राहूल मानकर,तेजराम कावळे,सिमेश्वर भलावी,दिपक भलावी व देवचंद कुंजाम हे सयुंक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांच्या मार्गदर्शनात करीत आहेत.विशेष म्हणजे या युवकांना काळविटाची व परिसराची संपुर्ण माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून देऊन पर्यटकांनाही माहिती कशी द्यायची याची कला अवगत करुन दिली जात आहे.भविष्यात हा काळविटाचा परिसर महत्वाचा पर्यटनकेंद्र होणार असून प्रशासनाचे चांगले सहकार्य काळविटच्या संवर्धनासाठी मिळत असल्याची माहिती मानद वन्यजीवरक्षक सावन बहेकार यांनी दिली आहे.