अदानीच्या राखेने शेतपिकांचे नुकसान मोबदला देण्यास टाळाटाळ-शेतकèयाचा आरोप

0
15

गोंदिया,दि.१६ : विद्युत प्रकल्पातील राख शेत पिकांकरिता संजिवनी ठरणार असल्यासंदर्भात अदानी विद्युत प्रकल्प प्रशासनाने दीड दोन वर्षापूर्वी कार्यशाळा घेऊन जनजागृती केली होती.परंतु तीच राख शेतकèयांच्या मेहनतीवर पाणी फेरत असल्याचा प्रकार समोर आला आहे.तिरोडा तालुक्यातील मलपूरी येथील एका शेतकèयाने राखेमुळे आपल्या पिकाचे नुकसान झाल्याची तक्रार कृषीविभागासह स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.त्या तक्रारीच्या आधारे झालेल्या चौकशीनुसार संबधित शेतकèयाला नुकसान भरपाई देण्यात यावे असे ठरल्याचे शेतकरी शैलेष परिहार यांचे म्हणने आहे.
गेल्या आठ महिन्यांपूर्वी तसा अहवाल तहसीलदारांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आला. शेतकèयांना नुकसानभरपायी देण्यात यावी,असा निर्वाळा देखील देण्यात आला.परंतु, अद्याप अदानी विद्युत प्रकल्पाने नुकसान भरपायी दिली नाही. उलट शेतकèयांने लावलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नुकसान भरपायी संदर्भात विचारणा करावयास गेल्यास अधिकारी धमकावतात असा आरोप केला आहे.
यासबंधात अदानी विद्युत प्रकल्पातील फ्लाय अ‍ॅशविभागाचे प्रमुख व्यवस्थापक व्ही.यु.सोलंकी यांना विचारणा केली असता त्यांनी परिहार यांची तक्रार नुकसान झाल्याबद्दल असल्याचे मान्य करीत त्यांच्या शेतपिकाची पाहणी व पंचनामा कृषी विभाग,पंचायत विभाग आणि तालुका प्रशासनाच्या अधिकाèयांच्या उपस्थितीत करण्यात आला.त्या पंचनाम्याचा अहवाल नागपूर येथील विभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला असून तिथून अहवाल येताच राखेमुळे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले तर संबधित शेतकèयाला नुकसानभरपाई देण्यासंबधी अदानी प्रकल्प प्रशासन तयार असल्याचे सांगितले.
तिरोडा तालुक्यातील अदानी विद्युत प्रकल्पाला लागून मलपुरी हे गाव आहे. या गावात राहणारे अल्पभूधारक शेतकरी शैलेश परिहार आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे अडीच एकर शेती असून शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे.
गेल्या अनेक वर्षापासून ते या व्यवसायात गुंतले असून शैलेश यांनी आपल्या शेतात साधारणत: ८ महिन्यापूर्वी भाजीपाला व इतर नगदी पिकांची लागवड केली होती. त्याच कालावधीत शेताच्या लगत असलेल्या पडिक जागेत अदानी विद्युत प्रकल्प अंतर्गत निघणारी राख मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत होती. त्या ठिकाणी राख टाकू नये, अशी विनंती शैलेश परिहार आणि गावकèयांनी अदानी प्रकल्पाकडे केली. मात्र अदानी विद्युत प्रकल्पाचे अधिकारी आणि कर्मचाèयांनी शेतकèयांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत मोठ्या प्रमाणात राख टाकणे सुरूच ठेवले. परिणामी राख परिसरातील शेतीत लावलेल्या पिकांवर बसून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या प्रकाराची तक्रार परिहार यांनी कृषी विभाग आणि तालुका प्रशासनाकडे केली. कृषी विभागाने पिकांची पाहणी केली असता नुकसान झाल्याचे आढळून आल्यामुळे राखेमुळे शेतातील पिकांचे ५० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला दिला. शेतकèयाचे नुकसान झाल्यामुळे त्या शेतकèयाला अदानी विद्युत प्रकल्प समुहाने तत्काळ नुकसान भरपायी देण्यात यावी, असे आदेश दिले. परंतु, या बाबीला तब्बल आठ महिने लोटले. भरपायी संदर्भात शेतकरी अदानी व्यवस्थापनाला विचारणा करण्यास गेले असता त्यांना धमकावण्यात आल्याचा आरोप शेतकèयांने केला.
नुकसानग्रस्त शेतकरी शैलेश परिहार यांनी शेतात पिकांची लागवड करण्याकरिता बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, पिकांचे नुकसान झाल्यामुळे आता त्या कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न शेतकèयांपुढे उपस्थित झाला आहे. शैलेश परिहार यांनी लागवड केलेल्या शेतातून सुमारे नऊ लाख रुपयांचे उत्पन्न येणार असल्याची आशा होती. परंतु, राखेमुळे त्यांच्या पिकांची राखरांगोळी झाली. यासंदर्भात प्रशासकीय अधिकाèयांना विचारणा केली असता, पत्रव्यवहार सुरू असल्याचे सांगत आहेत.