यवतमाळात सातवे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन आज

0
13

यवतमाळ,दि.२६-: आंबेडकरी साहित्य व कला अकादमी तथा नॅशनल आंबेडकराईटच्या वतीने आयोजित सातवे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन रविवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी १0 वाजता संदीप मंगलम्मध्ये आयोजिण्यात आले आहे.संमेलनाध्यक्षपदी डॉ. मंगेश बनसोड तर उद्घाटक म्हणून लोकनाथ यशवंत उपस्थित राहणार आहेत. संमेलनात ‘पुण्य नगरी’च्या मुख्य संपादक राही भिडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
उद््घाटन सत्रात विशेष अतिथी म्हणून सिनेअभिनेता मिलिंद शिंदे, राही भिडे, डॉ. महेंद्र भवरे, प्रा. सतेश्‍वर मोरे, प्रा. माधव सरकुंडे आदी मान्यवरांची उपस्थिती राहील. प्रमुख पाहुणे म्हणून नंदकुमार रामटेके, अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के, जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन, प्रकल्प संचालक विनय ठमके, सीओ सुदाम धुपे, जयंत वाणे, अजय गौरकार, नितीन सोनोने उपस्थित राहणार आहेत. दुपारी २ वाजता ‘आंबेडकरी साहित्य निर्मिती प्रक्रियेतील महिलांची सहभागिता : आव्हाने आणि उपाय’ या विषयावर राही भिडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. सायंकाळी ४ वाजता ‘आंबेडकरी चळवळ आणि आम्ही’ या विषयावर आंबेडकरी लोकन्यायालय हा अभिनव कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५ वाजता डॉ. अशोक इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ७ वाजता ‘इशारा’ या नाटकाचा प्रयोग तर रात्री ८ वाजता डॉ. मंगेश बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होईल.