खस उद्योग ठरतोय बोंडगाववासियांसाठी रोजगाराचे साधन

0
24

खेमेंद्र कटरे
गोंदिया- उन्हाळ्याची चाहूल लागताच अडगळीत पडलेल्या कूलरची आठवण सर्वांनाच येते. मग प्रत्येक व्यक्ती घरातील कोपèयात पडून असलेल्या आणि उन्हाच्या कहालीपासून संरक्षण देणाèया या कुलरच्या दुरुस्तीचे काम हाती घेत असतो. याच कुलरला लागणाèया खस ताट्यांची जुळवाजुळव सुरू होते. बाजारात या खस ताट्या विक्रीसाठी ठेवल्या जातात. या व्यवसायातूनसुद्धा उत्तमप्रकारे उलाढाल होते. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जूनीमोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी हे गाव या खसताट्या निर्मितीचे प्रसिद्ध केंद्र म्हणून ओळखले जाते. या खस व्यवसायाच्या माध्यमातून गावातील शंभरावर कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न सुटतो. या कुटुंबीयांचा हा परंपरागत उद्योग खसताट्या निर्मितीचा हंगामी व्यवसाय म्हणून नावारूपास आला आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनीमोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी गावातील शंभरावर कुटुंब आजही वंशपरंपरेनुसार खसताट्या बनविण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे गावातील इतर बेरोजगार लोकांना गावातच काम उपलब्ध होत असल्याने कामासाठी स्थलांतरित होण्यापासून त्यांना मुक्ती मिळाली आहे. दरवर्षी शेतीचा हंगाम संपतो न् संपतो तोच जानेवारीपासून बोंडगावदेवी गावात खसताट्यांच्या हंगामी व्यवसायाला सुरवात होते. गावातील एकदोन नव्हे तर तब्बल शंभरावर कुटुंब गेल्या ५०वर्षापासून खसताट्या बनविण्याचे काम करतात. यामुळे गावातील लोकांनी रोजगार निर्मिती करून गावातीलच इतर बेरोजगारांच्या हाताला काम उपलब्ध करून दिला. डिसेंबर महिन्यात शेतीची कामे संपली, की जानेवारी महिन्यापासून बोंडगावदेवीवासिय खसताट्यांसाठी लागणारा कच्चामाल खरेदी करून खसताट्या बनविण्याच्या निर्मितीला सहकुटुंब सुरवात करतात. बोंडगावदेवी येथे उत्पादित या मालाला महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड या राज्यातील कुलर उद्योजकांकडून मोठ्याप्रमाणावर मागणी असून या मालाची विक्री इतर राज्यासह स्थानिक बाजार पेठेतही केली जाते. त्यामुळे गावातील लोकांना रोजगाराकरीता बाहेरगावी जावे लागत नाही. बोंडगाव देवी हे गाव जंगलालगत असल्याने वन विभागाकडून बांबू देखील सहज उपलब्ध होतो.
एकीकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार रोजगार निर्मितीसाठी ग्रामीण भागात कला-कौशल्य मेळावे आयोजित करून रोजगार निर्मितीवर भर देते. तर दुसरीकडे बोंडगावदेवीवासियांचा हंगामी व्यवसाय असताना स्थानिक बँका मात्र कर्ज उपलब्ध करून देण्यात हाराकिरी करतात. आजही बोंडगावदेवीवासियांचा रोजगार आर्थिक पाठबळाअभावी हवा तसा आकार घेऊ शकला नसल्याची खंत येथील लघु उद्योजक व्यक्त करीत आहेत.
गोंदिया जिल्ह्याचा विचार केल्यास येथील तापमान ४७ अंश सेल्सिअस पर्यंत जातो. त्यामुळे गोंदियालगतच्या राज्यात देखील उष्णतेचा पारा हा ४५ अंशांच्या घरात जातो. एवढ्या तापमानात लोकांच्या अंगाची कहाली होते. या उन्हाच्या दाहकतेपासून दिलासा मिळावा म्हणून घरातील दाराखिडक्यांना खसताट्या लावून पाण्याचा मारा करून उन्हाच्या चटक्यांची तीव्रता कमी करतात. थंड हवा मिळविण्यासाठी लोक कुलरला खसताट्या लावतात. मात्र, वुडन खसच्या तुलनेत वनस्पतीच्या मुळांच्या खसला अधिक मागणी असते. हे खस महाग असून ओरिसा राज्यातून मागवावे लागते. वनपस्तीमूळापासून तयार खसताट्यांना केलेल्या शहरीभागात प्रचंड मागणी असते. या उद्योगाला आणखी चालना देण्याची गरज असून सरकारने या लघु उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून दिले तर बोंडगावदेवी येथे हा उद्योग नक्कीच उंची गाठल्याशिवाय राहणार नाही आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसुद्धा बèयापैकी करता येईल.