१५ मार्चला पिंडकेपार येथे जागतिक ग्राहक दिन

0
15

गोंदिया,दि.१० : तिरोडा तालुक्यातील पिंडकेपार येथे १५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे करतील. यावेळी तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी सुनिल सूर्यवंशी उपस्थित राहतील. तरी या कार्यक्रमास नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई व तिरोड्याचे तहसिलदार रविंद्र चव्हाण यांनी केले आहे.