राज्यपालांच्या हस्ते १४ व्यक्ती आणि संस्थांना वनश्री पुरस्कार

0
15

मुंबई दि.23: जागतिक वन दिनानिमित्त मंत्रालयात राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत १४ व्यक्ती आणि संस्थांना ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री’ तर वन विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना पदक देऊन नुकतेच गौरविण्यात आले.या कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुमित मल्लिक, प्रधान मुख्य वन वन-संरक्षक-वनबल प्रमुख सर्जन भगत, वन सचिव विकास खारगे आणि सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री’ पुरस्कार व्यक्ती गटात :शिवाजी शिवराम कपळे (औरंगाबाद), योगेश गुलाबराव पाटील (नाशिक), सचिनसिंह बळवंत पाटील ( पुणे), बाबासाहेब राधाकिशन शेळके(औरंगाबाद), सयाजीराव जयसिंगराव पाटील (पुणे).ग्रामपंचायत गटात ग्रामपंचायत कान्हेवाडी तर्फे चाकण, पो.इंदोरी, ता. खेड. जि. पुणे.
शैक्षणिक संस्था : कला, विज्ञान व वाणिज्य विद्यालय राहुरी. (नाशिक), संत जनार्दन स्वामी माध्यमिक विद्यामंदिर, हिंगणवेढे (नाशिक), श्री शिवाजी हायस्कूल, रामनगर जालना. (औरंगाबाद), शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे, माध्यमिक विद्यालय, रत्नागिरी (ठाणे), कै. गणपतराव आबाजी डोंगळे कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट, घोटवडे,कोल्हापूर (पुणे).
सेवाभावी संस्था :ट्री फॉर दि फ्युचर (TREE FOR THE FUTURE (TFTF ) रत्नागिरी, सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना लि. जि.कोल्हापूर.( पुणे), सरस्वती सांस्कृतिक व महिला कल्याण मंडळ, जालना (औरंगाबाद).वन विभागातील कर्मचारी अधिकारी यांना विविध पदक देऊन सन्मानित करण्यात आले त्यात सुवर्ण पदक : समाधान रघुनाथ मान्टे (अमरावती), सुरेश रुपचंद देसले (धुळे), आर.टी. समर्थ (गडचिरोली), विवेक भास्करराव राजूरकर (गडचिरोली), शेषराव बापूराव तांबे (औरंगाबाद), एस. बी. वाकोडे ( अमरावती), सुरेश सोपान दोंड (नाशिक), दत्तात्रय दौलतराव फापाळे (पुणे), के. व्ही. धानकुटे ( चंद्रपूर), मनोज दिगंबर मोहिते (नागपूर), एस.के. फटांगरे (पुणे), मुफद्दल आशिक हुसैन शाकीर (अमरावती कार्य आयोजन विभाग), संजय तानाजी भोईटे (सा.वि.व.पुणे), विजय नारायण सातपुते (सावृत्त.व.औरंगाबाद ).रजत पदक : ललिता काशिनाथ शेखरे (नाशिक),बरकत खान अमीर उल्ला खान(यवतमाळ ),जाकीर जैनुल पटेल (अमरावती), निशीकांत होमदेव कापगते(नागपूर), राकेश नागु खैरनार (धुळे), सुभाष रामशंकर पाटील(धुळे), एस.ए. पार्डीकर (अमरावती), ए.आर. कवासे (चंद्रपूर),पंकज वि.अळसपुरे (अमरावती), सचिन नानासाहेब डोंबाळे (गडचिरोली), सुनिल व्ही. देशमुख (नागपूर)यांच्यासमवेत हनुमंत गोविंद धुमाळ (उपसंचालक, सा.व.पुणे) यांचाही गौरव करण्यात आला.