लोधी समाज सामूहिक विवाह समारंभ २३ रोजी : केंद्रीय मंत्री उभा भारती येणार

0
18

आमगाव दि.८: आमगावच्या लोधी समाज सेवा समितीच्या वतीने लोधी समाज सामूहिक विवाह समारंभाचे आयोजन २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता आमगावच्या साई मंगलम लॉन येथे करण्यात आले आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यात दिल्ली येथील लोधी समाजाच्या राष्ट्रीय स्टार प्रचारक लोधी साधना भारती लग्न करणार आहेत.
उद््घाटन केंद्रीय जल संसाधन मंत्री उमा भारती यांच्या अध्यक्षतेत बालाघाटचे उद्योगपती गणपतसिंह मस्करे यांच्या हस्ते होईल. दीप प्रज्वलक म्हणून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार अशोक नेते उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा. लोधी महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तर प्रदेशचे आमदार विपीन डेविड, लोधी राजपूत जन.स. फरीदाबाद दिल्लीचे संस्थापक लखनसिंह लोधी, आमदार गोपालदास अग्रवाल, आमदार संजय पुराम, माजी आ. भेरसिंह नागपुरे, रमेश मटेरे, माजी आ. रामरतन राऊत, मनपा नागपूरचे माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा महासचिव सहषराम कोरोटे, खैरागढचे बिल्डर डोमरसिंह लोधी, महिला व बालकल्याण सभापती विमल नागपुरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे, अवंती साधना मंचचे अध्यक्ष डॉ. तिरथ नागपुरे, माजी जि.प. अध्यक्ष रजनी नागपुरे सह. इतर मान्यवर उपस्थित राहतील. कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन लोधी समाज सेवा समितीचे अध्यक्ष जागेश्‍वर लिल्हारे, उपाध्यक्ष रोशन लिल्हारे, सचिव रोशन गराडे, सहसचिव केलवचंद मच्छिरके, कोषाध्यक्ष युवराज बसोने, सह कोषाध्यक्ष ओंकार लिल्हारे यांनी केले आहे.