ओबीसी सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ जिल्हा व तालुकामुख्यालयी ११ एप्रिल रोजी

0
8

गोंदिया,दि.०९-गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने क्रांतीज्योती महात्मा ज्योतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्यसाधून ११ एप्रिल रोजी ओबीसी सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ जिल्हा मुख्यालयासह ८ ही तालुक्यात होणार आहे.गोंदिया येथे सदस्यता नोंदणी कार्यक्रमाचा शुभारंभ जयस्तंभ चौकातील ओबीसी संघर्ष कृती समितीच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता करण्यात येईल.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय पक्ष समन्वयक माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे, ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बी.एम.करमरकर,ओबीसी संघर्ष कृती समितीचे कार्याध्यक्ष अमर वèहाडे,मार्गदर्शक खेमेंद्र कटरे,उपाध्यक्ष कैलास भेलावे,महासचिव मनोज मेंढे,राजेश चांदेवार,शहर अध्यक्ष विष्णु नागरीकर,शिशिर कटरे,ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेचे दुलीचंद बुध्दे,तुलसीदास झंझाड,विनोद चौधरी,लिलाधर पाथोडे,नगरसेवक बंटी पंचबुध्दे,राजेश नागरिकर,गणेश बरडे,नरेंद्र तुरकर,सुनिल पटले,पी.डी.चौव्हान,प्रसिध्दी प्रमुख सावन डोये,चंद्रकुमार बहेकार,महेंद्र बिसेन,रवी सपाटे,हरिष मोटघरे,दिलीप लिल्हारे,प्रा.सविता बेदरकर,एस.यु.वंजारी,बंशीधर शहारे,खुशाल कटरे,विजय बहेकार, चनिराम मेश्राम,तिर्थराज उके यांच्यासह जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महात्मा फुले व डॉ.आबेंडकर यांच्या सयुंक्त जयंती कार्यक्रमाने या अभियानाची सुरवात ११ एप्रिल रोजी सुरु होणार असून १० मे पर्यंंत हे अभियान संर्पुण जिल्ह्यातील गावखेड्यात सुरु राहणार आहे.वयाची १८ वर्ष झालेल्या देशाच्या व राज्याच्या ओबीसी प्रवर्गात मोडत असलेल्या प्रत्येकाची नोंदणी केली जाणार आहे.त्यामुळे युवक युवती,विद्यार्थी,शेतकरी,शेजमजुर,कर्मचारी ओबीसी बंधु भगिनींनी या सदस्यता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून आपली नोंदणी करुन घ्यावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी केले आहे.ओबीसींना सवैधानिक हक्क अधिकार प्राप्त करुन घेण्यासाठी त्यांची संख्या महत्वाची आहे.प्रत्येकवेळी न्यायालय ओबीसींच्या जनगणनेचा प्रश्न उपस्थित करते परंतु केंद्रसरकार जनगणेवर लक्ष देत नसल्यानेच या सदस्यता नोंदणी मोहिमेच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील ओबीसींची संख्या किती याचा आकडा या माध्यमातून गोळा करुन तो ओबीसींच्या न्यायहक्कासाठी शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.त्यामुळे या ओबीसी सदस्यता नंोदणी मोहिमेत प्रत्येक ओबीसी बांधवानी ११ एप्रिलरोजी जिल्हामुख्यालयासह तालुका मुख्यालयस्थळी ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सदस्यता नोंदणी स्थळी मोठ्या संख्येने येऊन आपली नोंदणी करुन सदस्यता ग्रहण करावे असे आवाहन बबलू कटरे यांनी केले आहे.