चिखलदरा महोत्सव ९ जानेवारीपासून

0
18

अमरावती,-चिखलदरा महोत्सव हा पर्यटनकेंद्री असावा पर्यटकांना आकर्षित करणार्‍या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा त्यामध्ये समावेश असावा, अशी सुचना करून महोत्सवासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित चिखलदरा महोत्सवाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. डॉ.सुनिल देशमुख, आ. रवी राणा, जिल्हाधिकारी किरण गीते यासह संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. साहस, थरार आणि संस्कृतीची उधळण अशी टॅगलाईन असलेल्या या उत्सवात तीन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. त्यामध्ये ९, १० व ११ जानेवारी हे तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमासोबत पॅरासेलिंग, व्हॅलिक्रॉसिंग, रॉकक्लाइबिंग, हॉट एअर बलुन इ. साहसी उपक्रम भीमकुंड, बाकादरी कल्लालकुंड इ. ठिकाणी घेण्यात येणार आहे. याशिवाय रांगोळी रेखाटन, फोटो प्रदर्शनी आयोजिण्यात आली आहे. तसेच फुड फेस्टिव्हल, बांबु शिल्प प्रदर्शन, गावीलगड किल्ला येथे मशाल महोत्सव तसेच पक्षी निरीक्षण आदी उपक्रमांचा समावेश आहे. नगर परिषद चिखलदरा व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या समन्वयाने हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.