कर्जमाफी द्या, किंवा यूपीत समाविष्ट करा

0
13

बुलडाणा,दि.10: कर्जमाफी मिळणार नसेल, तर आमचे गाव उत्तर प्रदेशमध्ये समाविष्ट करा, अशी मागणी बुलडाणा जिल्ह्यातल्या सावळा गावाने केली आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाच्या छायेत… ना पीक, ना पाणी, ना धंदा अशी स्थिती सावळाच्या गावकऱ्यांवर ओढावली आहे.दुष्काळामुळे पाणी नाही. सोयाबीन गेले, तूर गेली, पीक नाही, एखादा धंदाही नाही असे गावातील शेतकरी सांगतात. अर्ज केले, विनंत्या केल्या, आंदोलने केली, पण सगळे व्यर्थ. पाणी नसल्याने तर गाव कोरडे झाले.आमच्या गावांच्या विहिरी कोरड्या झाल्या. पण वनखात्याने आडकाठी केली. त्यामुळे धरणाला मंजुरी मिळत नाही. ते धरण बांधावे, तरच काही तरी फरक पडेल, असे गावकऱ्यांना वाटते.परंतु कुणीच ऐकत नसल्याने अखेर सावळा गावाने एक अजब मागणी केली आणि प्रत्येकाचे लक्ष या गावाकडे वेधले गेले. आम्हाला उत्तर प्रदेश राज्यात समाविष्ट करा. जेणेकरुन आम्हाला कर्जमाफी मिळेल. त्याने प्रश्न सुटतील असे नाही, पण आम्ही नव्या दमाने उभे राहू, अशी गावकऱ्यांचे म्हणने असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिने प्रसारित केले आहे.
शेतमालाला दर नाही, शेतकऱ्यांची पिळवणूक थांबत नाही, नवे प्रकल्प मार्गी लागत नाहीत, पाणीही नाही. पैसाही नाही. पूर्वी स्थलांतरितांचे लोंढे उत्तर प्रदेशातनं महाराष्ट्रात यायचे. प्रवास उलटा होऊ नये, याची काळजी सरकारनं वेळीच घ्यायला हवी.