ओबीसी महासंघाची हैद्राबादेत ओबीसींच्या दिल्ली अधिवेशनाबाबत चर्चा

0
17

हैद्राबाद,दि.19-राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने येत्या ७ आगस्टला नवी दिल्ली येथे आयोजित ओबीसी महाधिवेशनासंबधी तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातील ओबीसी चळवळीत काम करणार्या संघटना व ओबीसी हितचिंतक लोकप्रतिनिधींची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.17 व 18 मे या दोन दिवसीय दौर्यात तेलगंणा येथील बकवर्ड क्लास फोरम फाॅ्र इम्पु््रवमेंट संघटना,महात्मा ज्योतीबा फुले स्मृती समिती तेलगंणा,आॅल इंडिया ओबीसी बँक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांची भेट घेऊन ओबीसी प्रवर्गाबाबतच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली.या बैठका व भेटी दरम्यान दिल्ली येथे आयोजित ओबीसी महाधिवेशनाला पुर्ण सहकार्या करण्याचे आश्वासन ओबीसी खासदार फोरमचे माजी अध्यक्ष व माजी खासदार व्ही.हनुमंत राव,राष्ट्रीय ओबीसी मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष व माजी न्यायाधिश ईश्वरय्या,टीडीपी खासदार टी देवेंद्र गौडा यांच्यावतीने मिळाले आहे.हैद्राबाद येथील बकवर्ड क्लास फोरम फार ईम्प्रुवमेंट च्या कार्यालयात झालेल्या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोंजक प्राचार्य बबनराव तायवाडे ,राजकीय समन्वयक माजी खासदार बोपचे,निमंत्रक सचिन राजूरकर, खेमेंद्र कटरे, बकवर्ड क्लास फोरम फार ईम्प्रुवमेंट महासचिव कस्तुरी जयप्रसाद, ओबीसी बँक कर्मचारी संघटनेचे सल्लागार व महात्मा फुले संस्था महासचिव बेमनपल्ली विठोबा,श्रीनिवास गौडा आदी उपस्थित होते. तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातून या अधिवेशनात ओबीसी समाजातील अधिकारी,लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार असे आश्वासन जयप्रसाद यांनी ओबीसी महासंघाला दिले.