महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात ‘समता विचार यात्रे’चे आयोजन

0
12

अमरावती,दि.28 : घटनात्मक मूल्यांच्या आग्रहासाठी राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी दिनांक २४ मे ते ३१ मे दरम्यान महाराष्ट्र आणि मध्याप्रदेशातुन ‘समता विचार यात्रे’चे आयोजन कुणाल रामटेके व सुशील मोहोड या दोन तरुणांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे. देशातील वाढती असामाजीकता आणि मानवाधिकारांच्या उल्लंनघना विरोधात उन्हाळ्यातील सुटयांचा सकारात्मक उपयोग करून घेत समतेचा विचार सामान्यांपर्यंत पोहचवण्याचा या तरुणांचा प्रयत्न आहे.फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित होत या यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे मत संयोजक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. याद्वारे शासनालाही काही मागण्या करण्यात आल्या असून त्यात प्रामुख्याने दलित, महिला व अल्पसंख्यांक समुदायावरील अत्याचाराविरोधात ठोस कारवाही बरोबरच शेतकरी आत्महत्या, शिक्षण प्रश्न, मानववाधिकार उल्लंनघाना बाबतही मागण्या करण्यात आल्या आहेत.

यात्रेच्या माध्यमातून प्रत्यक्ष जनतेशी मुक्त संवाद साधण्यात येत आहे. त्यासाठी परिवर्तनाची गाणी, विविध खेळ, गृहभेट, गटचर्चा, परिसंवाद, नुक्कड सभा, पथनाट्य आदींचा वापर करण्यात येत आहे. सामान्यांच्या विविध प्रश्नांवर शासन स्तरावर धोरणे आखण्यासाठी सामान्य जनतेत त्यांच्या हक्कांची जाणीव निर्माण करणे हा या यात्रेचा उद्देश असल्याचे मत यात्रा संयोजन समितीच्या कुणाल रामटेके व सुशील मोहोड यांनी व्यक्त केले.घटनादत्त अधिकारांविषयक सामाजिक जागृतीसाठी उन्हाळी सुट्यांचा सकारात्मक वापर करवून घेत समता विचार यात्रेचे आयोजन आम्ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केले आहे. त्यात नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समता विचार यात्रेचे संयोजक कुणाल रामटेके यांनी दिली आहे.