गोंदिया मंथनच्या माध्यमातून गोंदियाच्या विकासावर सकारात्मक चर्चा

0
8
खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.26- सोशल मिडिया म्हटले की सर्वाधिक चर्चा होते ती व्हॉट्सअप ग्रुपची जेव्हा फेसबुक,व्टिटरहेही त्यामध्ये मोडतात.परंतु व्हाटसअपचा गृप असा की यात जो सवांद चालतो त्या सवंदाच्या माध्यमातून एखादी समस्या,प्रश्न व मदतीची हाक दिली जाते.त्या हाकेला कधी कधी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आपण नक्कीच एैकले असाल.त्याचप्रमाणे गोंदियातही एक गोंदिया विधानसभा नावाचा व्हाटसअप गृप असून या गृपच्या माध्यमातून सामाजिक दायित्वाचे काम यशस्वीरित्या प्रसिध्दीचा हाव न ठेवता पाळण्यात आल्यानेही गृपचे वैशिष्ट ठरले आहे. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली, तर हरविलेल्या व्यक्तिला मिळवून दिले. असे अनेक कामे केल्याचे आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र गोंदिया जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यासाठी ५ वर्षा आधी गोंदिया विधानसभा या व्हॉट्स अॅप ग्रुप ची निर्मिती करण्यात आली.सोशल मिडियाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम हाती घेत गोंदिया शहराच्या विकासावर सदैव अग्रसर चर्चा घडवून आणणाèया गोंदिया विधानसभा व्हाटसअप गृपच्या वतीने रविवारला(दि.२५)आयोजित केलेल्या गोंदिया मंथन या कार्यक्रमातून गोंदिया शहराच्या विकासावरच नव्हे तर सौंदर्यीकरणावर एक चांगली चर्चा घडवून आणली गेली.
सोशल मिडिया सुध्दा सरकारच्या विकास कार्यात कशी सहकार्याची भूमिका पार पाडू शकते हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखविण्याचा स्तूत्य उपक्रम सादर करण्यात आला. पाच वर्षा आधी गोंदिया शहरातील एका १८ वर्षीय अभय गौतम या तरुणाने सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने या ग्रुपची निर्मिती केली होती. सुरवातीला या ग्रुप मध्ये १५ लोक असून आज २६५ लोक या ग्रुपचे सदस्य आहेत. यात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, लोप्रतिनिधी, अधिकारी, सामजिक कार्यक्रते, पत्रकार, डॉकटर, व्यापारी आदी सगळे असून अश्या पद्धतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करून नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी  “गोंदिया मंथन”  सारखा आयोजन हा राज्यातील पहिलाच असावा.
या गृपचा एडमीन अभय गौतम वयांने लहान असला तर त्यांनी गृपमधील इतर सहकारी मित्र व वरिष्ठ सदस्य पवार,दुर्गेश रहागंडाले,विजय अग्रवाल,संजय जैन,विनोद जैन,निलेश देशभ्रतार,राजेश कनोजिया,गोपीकिशन तिवारी आदींच्या सहकार्याने चॅरीटी कार्यक्रमाच्या माध्यमातून शहराच्या विकासासंदर्भात सोशल मिडियावर होणारी चर्चा एकत्र येऊन स्नेहमिलनाच्या माध्यमातून कशी करता येईल यावर परिकल्पना सादर केली.आणि त्यानुसार गोंदिया विधानसभा व्हाटसअपगृपमध्ये असलेल्या २५६ सदस्यांना गोंदिया मंथन या कार्यक्रमात ५०० रुपये शुल्क देऊन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.त्या आवाहनाला सदस्यांनी प्रतिसाद दिला व २५ जूनला गोंदिया मंथनचे यशस्वी आयोजन पोवार सांस्कृतिक सभागृहात पार पडले.कार्यक्रमाला विशेष मान्यवर पाहुणे म्हणून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले,पोलिस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील,जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे,उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर,डीन डॉ.रुखमोडे व विनोद अग्रवाल उपस्थित होते.
शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेराची गरज,बाई गंगाबाई व केटीएस सामान्य रुग्णालय परिसरासह मुख्य बाजारात महिलासांठी नसलेल्या सुलभ शौचालय  आणि शासकीय रक्तपेढीतील असुविधेवर या कार्यक्रमात सहभागी झालेले जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांचे लक्ष वेधण्यात आले.तत्पुर्वी उपस्थितांपैकी ५ सदस्यांच्या समस्या व सुझाव असलेल्या चिठ्याचे वाचन करण्यात आले.त्यामध्ये गोंदिया शहरात रेनवाटर हार्वेस्टिंगचा वापर करण्यासाठी मोहिम राबविण्यात यावे,ग्रामीण भागात रक्तदानासाठी चळवळ उभारणे,नगरपरिषदेच्या शाळातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासोबतच सुभाष बगीच्याच्या सौंदर्यींकरणासाठी सहकार्याची गरज आदी समस्या ठेवण्यात आल्या होत्या.या सर्व समस्यावर लगेच निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगत सोशल मिडियाच्या माध्यमातून जनसेवेसोबतच लोकप्रतिनिधींना सातत्याने आपल्या भागातील समस्याकंडे लक्ष देण्यासाठी जो संदेश दिला जातो त्यामाध्यमातून विकासाच्या प्रवाहाला नक्कीच गती मिळाली आहे,आणि गोंदिया मंथन च्या माध्यमातून गोंदिया शहराच्या विकासासाठी जे पाऊल उचलण्यात आले त्यावर आपण सर्वच काम करु असे सांगत गृपच्या सदस्यांचे अभिनंदन केले.तर ग्रुप मधील सदस्यांनी कुठ्ल्याली जाती धर्मावर टीका न करता किंवा कुणाचे मन दुखावणार नाही असे पोस्ट न करता त्यांची समजूत घालून विषय मार्गी लावावे असे जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे गोंदियाकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेला संदेश नक्कीच कौतुकास्पद म्हणावा लागेल.