जागतिक मातृत्व सुरक्षा दिन साजरा

0
285

भंडारा,दि.12-जिल्हा परिषद भंडारा, जिल्हा सामान्य रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र मोहदूरा व जयलक्ष्मी शिक्षण संस्था भंडारा यांच्या संयु्नत विदयमानाने प्राथमिक आरोग्य केंद्र मोहदूरा परिसरात १० जुलै रोजी जागतिक मातृत्व दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अतिर्नित जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद मोटघरे प्रामुख्याने उपस्थित होते. उदघाटक म्हणून डॉ. श्रीकांत आंबेकर, वैद्यकिय अधिकारी मोहदूराचे डॉ. सतीश गायकवाड, जिल्हा विस्तार व माध्यंम अधिकारी जिल्हा परिषद भंडाराचे डॉ. बी.एस. मस्के, डी.बी. चाङ्कले, अचला मेसन, डॉ. हिना सलाम उपस्थित होते. डॉ. मिलींद मोटघरे यांनी यावेळी बालकांचा जन्म सुरक्षित होण्यासाठी प्रसुती ही आरोग्य संस्थांमध्येच करण्याचे आवाहन केले. तसेच मातृत्व सुरक्षेकरीता सर्व मातांनी पंतप्रधान मातृत्व सुरक्षा कार्यक्रमांतर्गत प्रत्येक महिन्याचे ९ तारखेला प्राथमिक आरोग्य केंद्रात येवून आपल्या तपासण्या व समुपदेशनाचा लाभ घ्यावा व पूर्ण औषधोपचार घ्यावे, असे आवाहन केले. डॉ. बी.एस. मस्के यावेळी म्हणाले, गरोदर मातांनी आरोग्य सेवांचे महत्व लक्षात घेत आरोग्य सेवांचा लाभ घेण्यास सांगितले. तसेच सविस्तर या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला परिसरातील मोठया संख्येने गरोदर माता उपस्थित होत्या. उपस्थित गरोदर मातांची तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास जयलक्ष्मी शिक्षण संस्था भंडाराचे आनंद मैदंमवार, सनिल आदमने, राष्ट्रपाल सार्वे, कवन चित्रीव उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीते करीता प्राथमिक आरोग्य केंद्र मोहदूराचे सी.एम. बारापात्रे, ए.के. शेंडे, कु. शमा वैद्य, कु. आर.डी. चोपकर यांनी अथक प्रयत्न केले.