जिल्हा परिषदेचे ५३ सदस्य अभ्यास दौèयावर जाणार माऊंट आबू?

0
9

खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.१३- जिल्हा परिषदेच्यावतीने येत्या ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला सर्व जिल्हा परिषद सदस्यांची एक अभ्यास सहल आयोजित करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.यासाठी पाच विषय समित्याकडे असलेला गेल्यावर्षीचा व यावर्षीचा मिळून ४ लाख रुपयाच्या निधीचे नियोजन अभ्यास दौयासाठी केले जात आहे.यात एका विषय समितीचे दोन्ही वर्षाचे मिळून ८० हजार रुपयाच्या निधीचा समावेश राहणार आहे.आजपर्यंत जि.प.सदस्याव्यतिरिक्त इतरही सहलीत जात होते,यावेळी सुध्दा कितीजण सदस्यांव्यतिरिक्त जातात याकडे लक्ष लागले आहे.
हा निधी जिल्हा निधीतून विषय समित्यांना दिला जातो.५३ जिल्हा परिषद सदस्यांना राजस्थानातील माऊंट आबू येथे अभ्यासासाठी नेले जाणार असून यात २७ महिला सदस्य पदाधिकारीसमवेत आहेत.५३ महिला पुरुष जि.प.सदस्यासोबंत प्रत्येक पदाधिकारी यांचे स्वीय सहाय्यकासोबतच ,अधिकारी आणि काही कर्मचारी यांचा ताफा राहणार आहे.यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात चाललेल्या या अभ्यासदौèयासाठी विचारणा करण्यात आली असून काहींनी होकार दिला तर काहींनी वेळ मागितला आहे.
या अभ्यास दौèयावर उद्या १४ जुर्ले रोजी होणाèया स्थायी समितीच्या तहकुब बैठकीत अनौपचारिक चर्चेसह निमत्रंण सदस्यांना दिले जाऊ शकते. जेणेकरुन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील गैरव्यवहार आणि तुकडे पाडून करण्यात येत असलेल्या बांधकामावर प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी अभ्यास दौरा आयोजित तर केला नसावा ना अशी कुजबूज आहे.या संभाव्य अभ्यास दौèयाच्या खर्चाबाबत मुख्य लेखा वित्तअधिकारी मडावी यांना विचारणा करण्यासाठी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांचे म्हणने कळू शकले नाही.वास्तविक उद्या होणारी सभा ही ज्या दिवशी तहकुब करण्यात आली होती.त्यादिवशी सुध्दा गोठणगावला चांगली पार्टी जिल्हा परिषदेने आयोजित केली होती,त्या पार्टीत जि.प.सदस्याव्यतिरिक्त त्यांचे नातेवाईक हे सहभागी झाल्याचे छायाचित्रामधून स्पष्ट दिसून आले ते या अभ्यास दौर्यापासून दूर राहण्याची तीळमात्र शक्यता कमी वर्तविली जात आहे.
एकाचवेळी सर्व जिल्हा परिषद सदस्यांना कुठल्या योजनेतर्गंत अभ्यास दौèयावर नेले जाऊ शकते का यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडे विचारणा केली असता अधिक्षक पवार यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे असे अधिकार नसल्याचे सांगितले.तर कृषी व पशुसंर्वधंन विभागासह,आरोग्य,समाजकल्याण व महिला बालकल्याण विभागाला समिती सदस्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्याची परवानगी शासनाकडून असल्याचे सांगण्यात आले.
कृषी विभाग,महिला बालकल्याण विभाग,पशुसंवर्धन विभाग,आरोग्य विभाग व समाजकल्याण विभागातर्गंत विषय समिती सदस्यासंह उत्कृष्ठ शेतकरी यांना या अभ्यास दौèयात सहभागी केले जाते.हा दौरा महाराष्ट्र राज्यासाठी असतो,त्यावर जिल्हानिधीतून खर्च केला जातो.पाच विषय समित्यासांठी वर्षाकाठी ४० हजार रुपये अभ्यास दौèयासाठी मंजुर केले जातात.यापुर्वी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जे अभ्यासदौरे आयोजित करण्यात आले होते,ते केरळ,राजस्थान आणि विशेष म्हणजे देशाबाहेर नेपाल ला सुद्दा एका कार्यकाळात अभ्यास दौरा गेलेला होता.
महिला व बालकल्याण समिती सदस्यांचा दौèयात ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हाषदेमध्ये निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधीचे पंचायत राज,आदर्श ग्राम,निर्मल ग्राम,महिला बळकटीकरण,महिला व विकासाचे उपक्रम इ विषयाची माहिती घेण्यासाठी अभ्यास दौरे आयोजित करावे असे म्हटले आहे.परंतु आजपर्यंत कधीच पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या सदस्यांना महिला बालकल्याणच्या अभ्यास दौèयात स्थान मिळालेले नाही.पशुसर्वंधन समितीच्या सदस्यासह उत्कृष्ठ गोपालक व कृषी समितीच्या सदस्यासंह उत्कृष्ठ शेतकèयाचा समावेश त्या अभ्यास दौèयात असायला पाहिजे.परंतु या अभ्यास दौèयाकडे बघितल्यास त्यांच्याएैवजी दुसरेच सदस्य सहभागी होतात.