हेमलकसातील प्राणी संग्रहालय सुरूच राहणार

0
13

नवी दिल्ली(वृत्तसंस्था),दि.05ः- गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नक्षलग्रस्त दुर्गम भागात असलेल्या डॉ. प्रकाश आमटे यांचा हेमलकसामधील लोकबिरादरी प्रकल्पातील प्राणी संग्रहालय पूर्ववत राहण्यावर शिक्कामोर्तंब झाले आहे. डॉ. प्रकाश आमटे यांनी केंद्रीय वन पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांची शनिवारी भेट घेतली. त्यानंतर वन्यजीव प्राधिकरणाच्या अटींनुसार प्राणिसंग्रहालय सुरू राहणार आहे.
डॉ. प्रकाश आमटे यांनी हेमलकसामध्ये आदिवासींच्या सेवेसह अनाथ प्राण्यांचाही सांभाळ केला आहे. हेमलकसामधील त्यांच्या कार्याचे जगभर कौतुकही करण्यात आले. मात्र, मागील दिवसांपासून गेल्या काही दिवसांपासून त्यांना वन्य प्राणी पाळल्याबद्ल कें द्रीय वन्यजीव प्राधीकरणाने आक्षेप नोंदवले होते.त्यानंतर डॉ. प्रकाश आमटे यांनी दिल्लीत कें द्रीय वनपर्यावरण मंञी हर्षवर्धन यांची भेट घेतली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत वन्यजीव प्राधीकरणाच्या अटी शर्तीनुसार प्राणीसंग्राहलयाचा आराखडा बनवून त्यात प्राण्यांचे वास्तव्य ठेवण्यावर तोडगा निघाला आहे. त्यामुळे डॉ. आमटे यांना दिलासा मिळाला आहे. डॉ. प्रकाश आमटे यांनी ज्या सेवाभावी वृत्तीने प्राण्यांची काळजी घेतली आहे, ते पाहता सरकारने वन्यप्राणी अनाथालय म्हणून त्याला मान्यता दिली होती. वन्य प्राण्यांचा प्रतिपाळ करण्याबाबत इंदिरा पर्यावरण भवनात ठाण मांडेलल्या बाबूशाहीने बोट ठेवलेले जाचक नियम दुरुस्त करण्यासाठीचा एक मास्टर प्लॅन केंद्राकडे सादर करावा लागेल. डॉ. हर्षवर्धन यांनीही त्यांना हीच माहिती दिली. मात्र, स्वतः डॉ. आमटे यांना याची पूर्वकल्पना असल्याने त्यांनी हा मास्टरप्लॅन तयार करूनच आणला होता. नागपूरच्या प्राणी संग्रहालयाचे वास्तूविशारद अशफाक यांनीच हेमलकसातील प्राणी अनाथालयाच्या दृष्टीने खास हा मास्टरप्लॅन तयार केला आहे. हर्षवर्धन यांनी त्यास तत्त्वतः मान्यताही दिली व नियम जाचक नसावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. आता 6 नोव्हेंबरला केंद्रीय वन्यप्राणी प्राधिकरणाच्या बैठकीत डॉ. आमटे यांना हा मास्टरप्लॅन सादर करावा लागेल.