डिसेंबर महिन्यात मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचे आयोजन

0
17

गोंदिया,दि.29ः-जिल्ह्यात १ ते ३१ डिसेंबर दरम्यान मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ३0 वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या स्त्री-पुरुषांनी आपली मौखिक आरोग्य तपासणी जवळच्या आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय/स्त्री रुग्णालय येथे न विसरता करून घ्यावी.
मौखिक रोगाची लक्षणांमध्ये दात किडणे, हिरड्यामधून रे किंवा पस निघणे, वेडेवाकडे दात असणे, तोंडामध्ये सुज येणे, दातांवर काळे-पिवळे डाग येणे, दातांवर थर बसणे, तोंडाची दुर्गंधी येणे हे असून मौखिक कर्करोगाच्या लक्षणामध्ये तोंडाच्या पोकळीमध्ये पांढरा/लाल चट्टा असणे, तोंडाच्या पोकळीमध्ये व्रण/खळबळीत भाग विशेषत: एक महिन्यापासून अधिक काळ बरे न झालेले, नेहमीपेक्षा तोंड उघडण्यास अवघड जाणे, तोंड कमी उघडणे, जीभ बाहेर काढण्यास अवघड जाणे, आवाजामध्ये बदल होणे, अतिप्रमाणात लाळ सुटणे, चावणे, गिळणे, बोलण्यास अवघड जाणे अशाप्रकारचे लक्षणे आढळून येतात.
या मोहिमेदरम्यान आपल्या घरी भेटीकरीता येणार्‍या कर्मचार्‍यांना तपासणीकरिता सहकार्य करावे. तसेच मौखिक आरोग्य तपासणी जवळच्या आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय/स्त्री रुग्णालय येथे न विसरता करुन घ्यावी. ा मौखिक रुग्णाकरीता औषधोपचार व संदर्भीत सेवा विनामूल्य उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक गोंदिया यांनी कळविले आहे.