अहेरी जिल्ह्यासाठी चक्काजाम

0
10

अहेरीता.१
स्वतंत्र अहेरी जिल्हा निर्माण करावा या प्रमुख मागणीसह शेतक-यांना वनजमिनीचे पट्टे द्यावेत व त्यासाठी तीन पिढ्यांची अट रद्द करावी, बंद अवस्थेतीत हातपंप तत्काळ सुरू करावे इत्यादी मागण्यांसाठी आज (ता.१) अहेरी येथील सुभाषनगर फाट्यावर अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. प्रा. नागसेन मेश्राम, रघुनाथ तलांडे, विलास रापर्तीवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन क, रण्यात आले.
सुभाषनगर, जामगाव, अर्कापल्ली, चिंतलपेठ, तानबोडी, महागाव, मुत्तापूर इत्यादी गावांमधील शेकडो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प होती. आंदोलनानंतर नायब तहसीलदार चिलमवार व किरमे यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. उपरोक्त मागण्यांशिवाय ग्रामपंचायतींतर्गत विहिरी स्वच्छ करून पाणीपुरवठा करावा, आलापल्ली, अहेरी, कागजनगर लोहमार्ग सुरू करावा, देवलमरी व सुरजागड येथे लोहपोलाद उद्योग सुरू करावा, सुभाषनगर येथे प्रत्येक बसला थांबा देण्यात यावा इत्यादी २३ मागण्याही यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात राहूल मडावी, राजू तोरे, अतुल नागुलवार, माधव मांडरे, गणपत देशमुख, मारोती चौधरी, रावजी बेहरे, प्रदीप डोके, मोरेश्वर मुलकलवार, गणपत पोरेड्डीवार, गजानन सोनटक्के, रमेश मुद्रकोलवार, तिरुपती कावटीवार, संतोष चरडे, उमाजी डोके, सुमनबाई देशमुख, वच्छलाबाई मंडरे, सावित्रीबाई नागुलवार, शोभाताई चौधरी, विमलबाई डोके, इंदिराबाई चौधरी, तानाबाई बट्टे, सुरेखा डोके, संदीप चौधरी, बळीराम डोके, उद्धव कुत्तरमारे, परशुराम डोके, नामदेव नागुलवार, उमाजी हुलके इत्यादी नागरिक सहभागी झाले होते.