ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी जीवाचे रान करणार्‍या भाऊसाहेबांचे विचार जनमानसात पसरवू- इंजि. प्रदीप ढोबळे

0
18

पापळ (अमरवाती),दि.11:-  कष्टकरी शेतकरी व ओबीसी समाजासाठी आपल्या जीवाचे रान करणारे भाऊसाहेब डॉ पंजाबराव देशमुख यांचे विचार तळागाळातील जनमानसात पोहचविण्यासाठी आेबीसी सेवा संघ सतत कार्यरत राहील असे प्रतीपादन ओबीसी सेवा संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजि.प्रदिप ढोबळे यांनी केले.ते म्हणाले की,ओबीसी सेवा संघ हे कर्मचारी,अधिकारी, शेतकरी, विद्यार्थी व ईतर बुध्दीजीवी वर्गाचे सामाजिक विचारपीठ आहे.या विचारपीठाच्या माध्यमातून भाऊसाहेबांचे विचार जनमानसात पोचावे यासाठी सेवा संघाचे राज्यस्तरीय 8 वे अधिवेशन पापळ (वाढोणा) येथे आयोजित करण्यात आले आहे,असे विचार त्यांनी व्यक्त केले.ते ओबीसी सेवा संघाच्या 8 व्या राज्य अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

पापळ (वाढोणा) हे गाव अमरावती जिल्ह्य़ात असुन भाऊसाहेब डाॅ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव आहे . भाऊसाहेबाचे विचार , कष्टकरी,शेतकरी जनतेसाठी असलेली तळमळ, त्याचे विचार जगाला माहीत करण्यासाठीच ओबीसी सेवा संघाने राज्य अधिवेशन पापळ या भाऊसाहेबाच्या जन्मगावात घेतले.राज्यघटनेमध्ये ओबीसी समाजासाठी ज्या काही तरतुदी बघावयास मिळतात.त्या मिळविण्यात व समाजाला त्याचा लाभ मिळायला पाहिजे यासाठी सातत्याने भांडणारे भाऊसाहेब आपल्या समाजासाठी महान आहेत.या कार्यक्रमात बहुजन संघर्ष पाक्षिकाचे संपादक व जेष्ठ विचारवंत नागेश चौधरी नागपूर यांच्या कार्याचा गौरव “कर्मवीर पुरस्कार” देऊन करण्यात आला. या अधिवेशनाचे उदघाटन अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग माधवी खोडे(आयएएस) यांच्या हस्ते करण्यात आले.आपल्या उदघाटनपर भाषणात माधवी खोडे यांनी खेड्यापाड्यातील ओबीसी बहुजन समाजातील युवकांना स्पर्धात्कम परिक्षेत टिकण्यासाेबतच प्रशासनीक सेवेत येण्यासाठी मेहनत करण्याची गरज असल्याचे विचार व्यक्त केले.याप्रसंगी स्वप्निल वानखडे IAS,निशा शेंडे अमरावती यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमा आधी  सकाळी 10 वाजता गावातुन संविधानाचा व भाऊसाहेबाच्या विचाराचा जयजयकार करीत *संविधान दिंडी* काढण्यात आली.उदघाटन सोहळ्याला ग्रामगीताचार्य खुशाल ठाकरे,गजानन अमदाबादकर शेतकरी नेते,विजय अजबले सरपंच पापळ,डॉ राजेश पांडे धानोरा गुरव,
रत्नाताई सोनवणे धुळे हे भाऊसाहेब डॉ पंजाबराव देशमुख विचारपिठावर उपस्थित होते.

या अधिवेशनात ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी,ओबीसीचा घटनाविरोधी क्रिमीलेअर रद्द करण्यात यावा, ओबीसी शेतकरी यांना शेतीसाठी मोफत साहीत्य पुरविण्वियात यावे,विद्यार्थी साठी 100% स्कालरशीप देण्यात यावी व ईतर ओबीसींच्या विकासासाचे ठराव  पास करण्यात आले.या अधिवेशनाला महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून मोठ्या संख्येने ओबीसी समाजबंधु भगिनी व ओबीसी सेवा संघाच्या प्रतिनिधीसह इतर ओबीसी संघटनांचे प्रतीनीधी उपस्थित होते. संचालन महासचिव नरेंद्र गद्रे यांनी,प्रास्तविक इंजि. दिगंबर दळवी यानी केले.तर आभार रमेश धुळे ओबीसी सेवा संघ जिल्हाध्यक्ष अकोला यांनी मानले.विशेष म्हणजे विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातून या अधिवेशनासाठी गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी सेवा संघाचे  शेकडो ओबीसी पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी झाले होते.