…………..आणि मुले शाळेत जाऊ लागली

0
13

८ शालाबाह्य मुलांना केले शाळेत दाखल
गोंदिया,दि.15ः- मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश येथून स्थलांतरित झालेली काही कुटुंब कटंगी आणि नगर परिषद गोंदियाच्या भागात पाल ठोकून वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आली. त्यांची शाळाबाह्य मुले कटंगी व नगर परिषद परिषद परिसरात फिरतांना विषय सहाय्यक संदीप सोमवंशी व सुभाष मारवाडे यांना आढळून आली. त्यांनी आपल्या सहकारी व बालरक्षक म्हणून कार्य करणाऱ्या जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, गोंदिया मधील अधिव्याख्याता किरण रापतवार व प्राचार्य राजकुमार हिवारे यांच्या निदर्शनास हि बाब आणून दिली.
प्राचार्य राजकुमार हिवारे व बालरक्षक किरण रापतवार यांच्या टिमने झोपड्यावर जाऊन बालकांच्या शोध घेतला. तसेच त्यांच्या पालकांशी चर्चा करून शिक्षणाचे महत्व पटवून दिले. बालकांना शाळेत दाखल करण्याची विनंती केली. त्यामध्ये ६ ते १४ वयोगटातील रजियाशहा फकीर, इलफाजशाह फकीर, आदिलशाह फकीर, बिलालशाह फकीर, कुराणशाह फकीर, रुकमानशाह फकीर, संतोषकुमार वेंकट, रमण्णा, गौरीशंकर अन्नम या ८ बालकांना पालकांच्या सहमतीने जि. प. शाळा, कटंगी व नगर परिषद शाळा, मरारटोली या शाळामध्ये दाखल करण्यात आले. शाळेत प्रवेशावेळी त्यांना गणवेश, पेन, वही व इतर शालेय साहित्य उपलब्ध करून देण्यात आली. शाळेत असण्याचा व बागडण्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून आला.
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, गोंदिया टीममुळे ८ बालकांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे शक्य झाले.सदर कार्यासाठी जेष्ठ अधिव्याख्याता डॉ किरण धांडे , मुकेश रहांगडाले , गणेश मेंढे , सुनील हरीणखेडे ,दिलीप रामटेके सर्व विषय सहायक व साधनव्यक्ती वशिष्ट खोब्रागडे यांनी सहकार्य केले .