‘या, माझ्यावर बलात्कार करा’, तरुणीचं खुलं आवाहन

0
33

नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्त्रियांवर होणाऱ्या बलात्काराच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. अगदी तीन महिन्याच्या चिमुरडीपासून 90 वर्षांच्या स्त्रीवरही बलात्कार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

मानवतेला कलंक लावणाऱ्या या घटना दिवसेंवदिवस वाढत आहेत. बलात्कार करणाऱ्यांमध्ये मानवतेचा अंशही नसतो. बस, ट्रेन, रिक्षा किंवा रस्त्यावरुन जाणाऱ्या स्त्रीकडे नेहमीच कामवासनेने पाहिले जाते. दुर्दैवाने आपला समाजही या घटनांविरोधात म्हणावा तितका जागरुक दिसत नाही.

समाजाच्या याच बेफिकीरीवर आणि बलात्कार करणाऱ्या नराधमांच्या विरोधात आवाज उठवला आहे माधुरी देसाई या तरुणीने. ‘आओ, मेरा रेप करो’ असे उपरोधिक आवाहन माधुरी देसाई हिने एका व्हिडिओतून केले आहे.(साभार एबीसी न्युज)