प्रवीण दराडे नागपूर जिल्ह्याचे पालक सचिव

0
17

नागपूर – मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव प्रवीण दराडे यांची जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख शासकीय तसेच विकासाच्या योजना झपाट्याने मार्गी लागाव्या याकरिता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पालक सचिवांची नेमणूक केली आहे.

प्रवीण दराडे नागपूरचे जिल्हाधिकारी तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे सभापतीसुद्धा होते. यामुळे त्यांना जिल्ह्याचा चांगला अभ्यास आहे. येथील प्रश्‍न, समस्या, अडचणींची जाणीव आहे. त्यांच्याच नेतृत्वात नागपूर मेट्रो रेल्वेची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. मेट्रो रिजनच्या विकासासाठी नागपूर सुधार प्रन्यासची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. मेट्रो रिजनचासुद्धा आराखडा दराडे यांच्याच कार्यकाळात आखण्यात आला. अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी “लॅंड पुलिंग‘ पद्धतीने मेट्रो रिजनचा विकास करणार असल्याची घोषणा केली आहे. शहरातील विकासासंबंधी जवळपास सर्वच माहिती जिल्हाधिकारी आणि सुधार प्रन्यासचे सभापती या नात्याने प्रवीण दराडे यांना आहे.

घोषणा झाल्यानंतरही मंत्रालयांमध्ये अनेक विषय पडून राहतात. त्याचा नियमित पाठपुरावा होत नाही. यामुळे अनेक विकासाच्या योजना प्रलंबित राहतात. नागपूर जिल्ह्याची एकही योजना प्रलंबित राहणार नाही याची दक्षता पालक सचिव म्हणून घेतल्या जाईल. मेट्रो असो की मिहान प्रकल्पाची आता नागपूरकरांना जास्तवेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.
प्रवीण दराडे