क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारोहाचे आयोजन आज

0
23
गोंदिया,दि.०२: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारोह समिती महिला संगठन गोंदियाच्यावतीने ३ जानेवारी बुधवारला सकाळी ११ वाजता क्रीडा संकूल समोरील संथागार येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८७ व्या जयंती समारोहा निमित्त महिला मुक्ती पर्व कार्यक़्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांती गेडाम यांच्या हस्ते विद्याशिला यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कार्यक़्रमाला मुख्य वक्ता म्हणून सत्यशोधक चळवळीच्या प्रखर वक्त्या नुतन माडवी, मेट्रो ट्रेन चालक सुमेधा मेश्राम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी बचत गट प्रदर्शनाचे आयोजन तर कुंभारेनगर स्थित संस्कार केंद्रात प्रबोधनकार प्रा. भगवान गावंडे यांच्या संगितमय प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.