आज मानसिक आरोग्य कार्यक्रम ताणतणावमुक्त मानसिक आरोग्य शिबीर

0
13

गोंदिया,दि.२ : केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत आज ३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात ताणतणावमुक्त मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर हे करतील. मुख्य अतिथी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अपुर्व पावडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.धीरज लांबट हे उपस्थित राहणार आहेत. या आत्महत्या प्रतिबंधक शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनोविकृती तज्ञ डॉ.यामीनी येळणे व डॉ.आनंद लाडे यांनी केले आहे.