भिमा कोरेगाव घटनेचा नोंदविला निषेध उद्या गोंदिया बंदचे आवाहन

0
13
गोंदिया,दि.०२ः-भिमा कोरेगाव येथील शौर्य दिनाला २०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्य शहीद स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो बहुजन बांधव तेथे एकत्र झालेले होते.त्यामधे सर्वच पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते सुध्दा उपस्थित होते.परंतु विकृत प्रवृत्तीच्या काही लोकांनी जाणीवपूर्वक षडयंत्र रचून १ जानेवारीच्या कार्यक्रमावर जो हल्ला केला त्याचा जाहीर निषेध गोंदियात सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षाच्यावतीने नोंदविण्यात आले.तसेच निषेधाचे निवेदन उपविभागीय अधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.त्याचप्रमाणे उद्या बुधवार 3 जानेवारीला गोंदिया जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.डाॅ.बाबासाहेब सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष धीरज मेश्राम यांनी बंदला सर्व नागरिकांनी,शैक्षणिक संस्था,काॅलेज,महाविद्यालय व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून शांततापुर्ण वातावरणात बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.या बंदचे आवाहन सर्व पुरोगामी,बहुजन ओबीसी संघटनांच्यासयुंक्तवतीने करण्यात आले आहे.
दलित,मराठा,ओबीसी व समस्त बहुजन बांधवांनी एकत्रितपणे या विकृत घटनेचा निषेध करावा.तसेच या घटनेमागे जो ‘ मास्टर माईंड ‘ आहे त्याचा पोलिसांनी आधी शोध घेवून त्याचे नाव जनतेसमोर जाहीर करावे.त्यामुळे दोन समाजात विनाकारण निर्माण होणारे गैरसमज व अफवा थांबतील.आपण सर्व परिवर्तनवादी लोकांनी शांत डोक्याने व नियोजनपूर्वक या प्रसंगाचा सामना करायचा आहे.त्यामुळे कोणीही भडकावू वक्तव्य न करता आपले पूर्ण लक्ष दोन समाजात वितुष्ट निर्माण करणाèया मास्टर माईंंडला शोधून काढणाèयावर केंद्रित करावे असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले.या निषेध सभेमध्ये, दिपेन वासनिक,कैलास भेलावे,मधु बनसोड,एड.राजकुमार बोंम्बार्डे,डॉ.मिलींद राऊत,डी.एस.मेश्राम,अतुल सतदेवे,मिलिंद गणवीस,विलास राऊत,रामचंद पाटील,राजेश कापसे,सुनिल भोंगाडे,परेश दुरुगवार,धनेद्र भुरले,सुशीला भालेराव,संता गणवीर,विलास राऊत,वसंत गणवीर,शुध्दोदन शहारे,शालीनी डोंगरे,धिरज मेश्राम,यशपाल डोंगरे, निलेश देशभ्रतार, विनित शहारे,देवा रुसे,तहसिलदार रामटेके,एच.आर.लाडे,अशोक बेलेकर,श्री बोम्बार्डे,पुरुषोत्तम कटरे यांच्यासह प्रबुध्द विनायतकारी संस्था, समता संग्राम परिषद, समता सैनिक दल,डॉ.बाबासाहेब सार्वजनिक जयंती उत्सव समिती,बहुजन समाज पक्ष,बीआरएसपी,काँग्रेस,इंडियन वेल्फेयर सोसायटी,बहुजन महासंघ,ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघासह परिवर्तनवादी संघटना,प्रवर्तक बहु.संस्था,राजगिरी संस्था,पिपल रुरल एन.मुवमेंट,बार असोसिएशन सहभागी झाल्या होत्या.
सडक अर्जुनी येथे सुध्दा तहसिल कार्यालयासमोर माेर्चा काढून निषेध सभा घेण्यात आली.यावेळी माजी कृषी अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे,राजेश नंदागवळी यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.