संत चोखामेळा पुरस्काराची सुरूवात यावर्षापासून करणार- राजकुमार बडोले 

0
32

राज्यातील पहिला पुरस्कार प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना

गोंदिया,दि.14, चौदाव्या शतकात जातीव्यवस्थेच्या विरोधात संतसाहित्यातून बंड पुकारणारे संत चोखामेळा यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या प्रबोधनकार तसेच समा जात जातीय धार्मिक सलोखा जपून स्वातंत्र्य, समता, बंधुता सामाजिक न्याय,व्यसनमुक्ती अशा क्षेत्रात प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना या वर्षापासून संत चोखामेळापुरस्कार देणार अशी घोषणा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केली.

ते म्हणाले की, संत चोखामेळा हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी  संतकवी होते. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले होते.ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्थायांच्या विळख्यात अडकले. त्यांचा जन्म विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा तालुक्यातील मेहुणा या गावी झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशेपंचविसाव्या जयंती निमित्त संत चोखामेळा यांच्या जन्मगावातील स्थळाचा विकासहीकरण्यात येईल. यासंबंधीची घोषणा लागलीच करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.संत चोखामेळा यांच्या नावे राज्यातून एका व्यक्तीस पुरस्कार दिला जाईल,पुरस्कारामध्ये एक्कावन्न हजार रूपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह असे स्वरूप रहाणार आहे.

विदर्भातील अकोल्या जिल्ह्यात राहणारे सत्यपाल महाराज हे संत तुकडोजी महाराजांचावारसा जपताहेत.. सप्तखंजिरी भजन करत ते समाजप्रबोधन करतात. दिमडी वाद्याच्यामदतीनं वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर भाष्य करत गावागावांमध्ये जागर करतात. विनोदीशैलीनं विषयाची मांडणी करत श्रोत्यांचं मनोरंजनही करतात, अशा प्रबोधनकारास संतचोखामेळा यांच्या नावाचा पहिला पुरस्कार देण्याचे आम्ही ठरवेल आहे. यासंबंधीची तारिखलवकरच जाहीर केली जाईल असेही बडोले यांनी जाहीर केले.