संत साहित्य संमेलनात भजन स्पर्धा:मंडळांना सहभागी होण्याचे आवाहन

0
149
अ.भा.मराठी संत साहित्य संमेलन भव्य खुली भजन स्पर्धा
• पुरुष व महिला भजन मंडळांसाठी बक्षिसे
• 13 फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी
गोंदिया,दि.12 : वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त वतीने गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव येथे 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान 7 व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संत साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी 15 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता भव्य खुली भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेत यशस्वी ठरणाऱ्या पुरुष भजन मंडळाला अनुक्रमे प्रथम- 31001 रुपये, द्वितीय 21001 रुपये, तृतीय 15001 रुपये, चतुर्थ 10001 रुपये आणि पाचवे 5000 रुपये. महिला भजन मंडळाला प्रथम- 21001, द्वितीय- 15001 रुपये, तृतीय- 10001 रुपये, चतुर्थ- 5000 रुपये बक्षिसे पुरस्कार स्वरुपात देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट तबला वादकाला 2001 रुपये, उत्कृष्ट हार्मोनियम वादकाला 2001 रुपये व उत्कृष्ट खंजेरी वादकाला 2001 रुपये बक्षिसे देण्यात येणार आहे.
भजन स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे असून यामध्ये प्राचिन संतांचा एक अभंग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे देशभक्तीपर एक भजन आणि व्यसनमुक्तीवर एक भजन सादर करावे लागेल. यापैकी एक रुपक तालात सादर करणे आवश्यक आहे. वेळेचे बंधन लक्षात घेता कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त पाच भजने घेण्याचे आयोजक ठरवतील. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. भजन मंडळ एका गावातील असावे. आधारकार्डची सत्यप्रत आवश्यक. सादर करण्यात येणाऱ्या भजनांची लिखित प्रत सादर करावी लागेल. भजन मंडळांना कोणतीही उजर-तक्रार करता येणार नाही. परीक्षकांनी दिलेला निर्णय अंतिम राहील. स्पर्धेच्या नियम व अटी-शर्तीमध्ये बदल करण्याचे सर्वस्वी अधिकार आयोजक समितीला राहील.
या स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या भजन मंडळांनी श्री.राघोर्ते (9422855505), श्री.वेठे (9421816868), वासुदेव वांढरे (9860452687), रत्नाकर बोरकर (9403242931), संजय जांभूळकर (9764741826), विजय बिसेन (9420620830), प्रशांत शहारे (9637790982), दिलीप चौधरी (9373317001), पंकज रहांगडाले (9370733321), चंद्रशेखर अगडे (8149693235) यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. प्रवेश स्विकारण्याची अंतिम तारीख 13 फेब्रुवारी आहे.