35 वर्षांत पहिल्यांदा मेंबर्ससाठी बंद झाला ‘क्‍लब’

0
17
वाढदिवसाच्या शुभेच्छा

अहमदाबाद- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्राध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय आणि सून रिशिता यांच्या विवाहाचे रिसेप्शन आज (गुरुवारी) कर्णावती क्लबमध्ये होणार आहे. या रिसेप्शनसाठी 6,500 पाहुण्यांना निमंत्रित करण्‍यात आले आहे. पार्किंगसाठी क्लबमधील जॉगिंग ट्रॅक, स्विमिंग पूल आणि प्ले कोर्ट्स सायंकाळी चार वाजेपासून क्लब मेंबर्ससाठी बंद राहाणार आहे. क्लब व्यवस्थापनेने 9,500 मेंबर्सला बल्क मेसेज पाठवून याविषयी माहिती दिली आहे. क्लबच्या 35 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा मेंबर्ससाठी कर्णावती क्लब बंद राहाणार आहे.

जय आणि रिशिताचा विवाह 10 फेब्रुवारीला झाला होता. रिसेप्शनमध्ये अनेक हायप्रोफाइल राजकीय नेते, उद्योगपती आणि बिल्डर्स सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. रिसेप्शनची तयारी पूर्ण झाली असून कार्यक्रमस्थळ पांढरा आणि भगव्या रंगाच्या पडद्यांनी सजवले आहे.

पार्किंगचा ठेका एका खासगी कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. क्लब परिसरात 1200 कार पार्किंगची व्यवस्था करण्‍यात आली आहे. तसेच क्लब जवळील मैदानावर देखील पार्किंगची व्यवस्था केली आहे.