गुगलने दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा

0
13

नवी दिल्ली- आठ मार्च हा दिवस जगभरात महिला दिन म्हणून साजरा केला जातो. गुगलने या विशेष दिवशी अनोखे डूडल तयार करुन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अंतराळ क्षेत्र, शास्त्रज्ञ, शिक्षक या विविध क्षेत्रांतील महिला गुगलच्या होमपेजवर दाखवण्यात आल्या आहेत.
सध्या प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. मग ते अंतराळ विज्ञान असो वा मेडिकल अथवा कला क्षेत्र. सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. या महिला शक्तीला गुगलने डुडलच्या माध्यामातून सलाम केला आहे.
अडथळ्यांची शर्यत पार करत ज्या महिलांनी वेगळी वाट धरली आणि त्यात त्या यशस्वीही झाल्या अशा महिलांचा डूडलच्या माध्यमातून गौरव करण्यात आला आहे. महिलांना त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात सतत यश मिळण्यासाठी, पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा दिली आहे.