महाराष्ट्र अंनिसतर्फे संविधान दिनानिमित्त काव्य मैफिल

0
18

गोंदिया,दि.२०- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,जिल्हा शाखा गोंदियाच्यावतीने २६ नोव्हेंबर,संविधान दिनानिमित्त दुपारी १२.३० वाजता काव्य मैफिलीचे आयोजन एम.जी.पॅरामेडिकल कॉलेज,चंद्रशेखर वॉर्ड गोंदिया येथे करण्यात आले आहे.उल्लेखनीय असे की भारतीय संविधानाची ओळख भारतीय समाजाला व्हावी या हेतूने महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या मार्गदर्शनानुसार सन २००७ पासून संविधान जागर उपक्रम सुरू आहे.सदर काव्य मैफिल कवी रमेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली व ङ्क डायरी ङ्ककार कवी युवराज गंगाराम यांच्या सुत्रसंचालनात होणार असून बापू इलमकर,शशी तिवारी,लक्ष्मीकांत कटरे,निखिलेशसिंह यादव,
मनोज बोरकर,सुरेंद्र जगणे,मिलिंद रंगारी,असीम आमगावी,प्रियंका रामटेके आणि शिव नागपुरे हे निमंत्रित कवी आहेत. या आयोजनासाठी डी. टी. कावळे,डॉ.माधवराव कोटांगले,अनिल गोंडाने,विनोद बन्सोड,रमाकांत खोब्रागडे,अ‍ॅड.अमित उके,पल्लवी रामटेके, माणिक गेडाम आदी पदाधिकारी परिश्रम घेत असून या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र अंनिस गोंदिया जिल्हा शाखाध्यक्ष माणिक गेडाम यांनी केले आहे.