डॉ. प्रभाकर लोंढे समाज रत्न पुरस्काराने​ सम्मानित

0
13

गोंदिया, दि.२०– जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय परसवाडा चे प्राचार्य डॉ. प्रभाकर लोंढे यांना नुकतेच, जिरो माइल फाउंडेशन नागपूर द्वारा “समाजरत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नागपूर मधील होटल हेरिटेज च्या स्टार सभागृहात पार पाडलेल्या शानदार समारोहात मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून भूतपूर्व मंत्री दत्ता मेघे उपस्थित होते. ळतर प्रमुख अतिथी म्हणून जागतिक संसद व संविधान संघटनेचे सदस्य आंतरराष्ट्रीय संशोधक डॉ. सुधीर तारे, नागपूरच्या महापौर नंदाताई जिचकार, ठाणे भाईंदर च्या महापौर गीताताई जैन, पंकज सहाय, अड. काळे, न्युरोलाजिस्ट पालतेवार हे दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये विशेषतः​ भटक्या-विमुक्तांसाठी कार्य करणाऱ्या डॉ. लोंढे यांना विविध सामाजिक, साहित्यिक संस्था द्वारा यापूर्वीसुद्धा सन्मानित करण्यात आलेले आहे. हा पुरस्कार राष्ट्रीय स्वरूपाचा असून शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या व नावलौकिक असलेल्या डा. लोंढे यांना समाजरत्न पुरस्काराने​ सन्मानित केल्याने आमच्या फाउंडेशनच्या कार्याला महत्व प्राप्त झाले आहे असे गौरवोद्गार फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ आनंद शर्मा यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले.
हा पुरस्कार डॉ लोंढे च्या उल्लेखनीय कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव असल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहेत.याशिवाय १० डिसेंबर मानवाधिकार दिवसासंबंधाने ओ. पी. जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी दिल्ली येथे “ह्युमन राईटस् अंड ह्युमनिटी” या विषयावर आयोजित वर्ड पार्लमेंट अंड कांस्टीट्युशन असोसिएशनच्या​ दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये ते सहभागी होणार आहे.