लोकसभा, विधानसभेसारखीच ग्रामसभाही सक्षम हवी – पंकजाताई मुंडे

0
9

तिरोडा पंचायत समितीला नागपूर विभागाचा द्वितीय पुरस्कार
मुंबई-ग्रामीण विकास हा देशाच्या विकासाचा कणा आहे. गावांच्या विकासासाठी आपल्याला प्राथमिकता, प्रबोधन, प्रचार आणि प्रशिक्षणावर भर द्यावा लागेल. पंचायत राज संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र हे अग्रणी राज्य आहे. यातून पुढे आलेल्या महिलांना प्रशिक्षण देऊन ग्रामविकासामध्ये त्यांचे जास्तीत जास्त योगदान घेतले जाईल. विकासाच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग लाभल्याशिवाय त्याला पूर्णत्व येऊ शकत नाही.तर लोकसभा, विधानसभेसारखीच ग्रामसभाही सक्षम असली पाहिजे असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी केले.त्या पंचायत राज अभियान 2015 अंतर्गत गुणवंत अधिकारी,कमर्चारी व स्थानिक स्वराज संस्था पुरस्कार वितरण सोह्ळ्याच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. राज्याचे राज्यापाल विद्यासागर राव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री केसरकर यांच्यासह इतर मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना ना.मुंडे म्हणाल्या की ग्रामविकास विभागामार्फत यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जातील. ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदांप्रमाणे पंचायत समित्याही बळकट करणे आवश्यक असून यापुढील काळात त्यासाठी व्यापक प्रयत्न करु, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, ग्रामीण भागातील लोकांच्या हिताच्या दृष्टीने शासनामार्फत अनेक योजना राबविण्यात येत आहेत. पंचायत राज संस्थांनी त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. विकास हा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज संस्थांनी प्रयत्न करावेत. पंचायत राजमध्ये मोठी शक्ती असून त्याचा वापर सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी व्हायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यावेळी नागपूर विभागातील यशंवत पंचायत राज अभियानातील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार तिरोडा पंचायत समितीला देण्यात आला.हा पुरस्कार गटविकास अधिकारी एन.आर.जमईवार,सभापती ललीता जांभुळकर यांच्यासह उपसभापती व ग्रामविकास अधिकारी यांनी स्विकारला.