अमरावती शहरात उभारली ६० फुटांची विक्रमी गुढी

0
11

अमरावती – अमरावतीच्या राजकमल चौकात नवयुवक विद्यार्थी संघटनेतर्फे ६० फूट उंच विक्रमी गुढी उभारण्यात आली असून ही गुढी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

चैत्र महिन्यातील नवीन वर्षाचा पहिला दिवस वर्षप्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा. हिंदू संस्कृतीप्रमाणे अत्यंत पवित्र असा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण. सुखकारक वर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा. राजकमल चौकातील नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या वतीने ६० फूट उंच गगनचुंबी गुढी उभारण्यात आली आहे. नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या वतीने अनेक सामजिक उपक्रम राबविण्यात येतात. यात प्रामुख्याने नववर्षाची गुढी, गोकुळाष्टमीला दहीहंडी आणि नवरात्रोत्सवाला येणाऱ्या भाविकांसाठी अल्पोपाहार हे तीन मुख्य उपक्रम या संघटनेतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून राबवले जातात. ६० फूट उंच उभारण्यात आलेल्या या गुढीची आज सकाळी १० वाजता विधिवत पूजा करण्यात आली.