पुण्यात रांका ज्वेलर्सने साकारली सोन्याची पैठणी

0
13

पुणे- महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत आजही भरजरी महावस्त्र अर्थात पैठणी साडीला मानाचे स्थान आहे. सोन्याचे दागिने आणि पैठणी हा महिलांचा ‘विक पॉइंट’ म्हटले जाते. मात्र, ही पैठणी सोन्याची असेल तर.. हो, सोन्याची पैठणी.
पुण्यातील रांका ज्वेलर्सने नुकतीच सोन्याची पैठणी साकारली आहे. या पैठणीची किंमत सुमारे ५१ लाख रुपये आहे. जगातील पहिली सोन्याची पैठणी असल्याचा दावा देखील रांका ज्वेलर्सने केला आहे.
रांका ज्वेलर्सची ब्रँड एँम्बेसिडर अभिनेत्री विद्या बालन हिच्या हस्ते सोन्याच्या पैठणीचे नुकतेच अनावरण करण्यात आले. ही पैठणी बनवण्यासाठी दीड किलो सोने वापरण्यात आले आहे. ३५ सुवर्णकारागिरांनी तीन महिने अथक परिश्रम घेऊन ही पैठणी साकारली आहे.
एका ग्राहकाच्या मागणीवरून ही सोन्याच्या पैठणी साकारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पैठणीच्या काठावर सोन्याची नक्षी असून बुट्टय़ाही सोन्याच्या आहेत.
दरम्यान, रांका ज्वेलर्स यापूर्वी सोन्याचा शर्ट साकारला होता. या सोन्याच्या शर्टाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली होती. त्याचप्रमाणे या सोन्याच्या पैठणीची देखील गिनीज बुकमध्ये नोंद होऊन तिला जागतिक मान्यता मिळेल, असा विश्वास रांका ज्येलर्सने व्यक्त केला आहे.