ओबीसी शिष्यवृत्ती व क्रिमीलेयरला घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

0
10

गोंदिया-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी आघाडीच्यावतीने आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी विद्याथ्र्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आणि क्रीमीलेयरची कमी केलेल्या मर्यादेला घेऊन भाजप सरकारच्या विरोधात धरणे देण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे,ओबीसी आघाडीचे अध्यक्ष बबलू कटरे,जि.प.सदस्य गंगाध़र परशुरामकर,दुर्गा तिराले,राजलक्ष्मी तुरकर,मनोहर चंद्रिकापुरे,केतन तुरकर,जीवन लंजे,पप्पु राणे,सुनिल पटले,तुकाराम बोहरे,मोहनलाल पटले आदी उपस्थित होते.
राज्यातील भाजप सेना सरकारने ओबीसी विद्याथ्र्यांच्या शिष्यवृत्तीसह ओबीसी क्रिमीलेयरची मर्यादा साडे चार लाख ठेवल्याच्या विरोधात हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.शासनाने क्रीमीलेयरची मर्यादा ८ लाख करण्यात यावे.अनुसूचित जाती/जमाती प्रमाणे ओबीसी विद्याथ्र्यांना शैक्षणिक शुल्क व परिक्षा शुल्काची १०० टक्के प्रतिपुर्ती लागू करण्यात यावे.मागील दोन वर्षापासून प्रलqबत असलेली ओबीसी विद्याथ्र्यांची शिष्यवृत्ती त्वरीत देण्यात यावे.ओबीसी समाजाची जनगणना करुन आर्थिक व सामाजिक जनगणनेत समावेश करण्यात यावे.शासनाने ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी उपस्थित मान्यवरांनी धरणे आंदोलनात विचार व्यक्त करतांना दिला.धरणे आंदोलनानंतर जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.