अवयव दानाबद्दलच्या जनजागृतीसाठी जुही पवार ब्रॅंड अॅम्बॅसिडर

0
13

मुंबई : आपल्या यकृताचा भाग आपल्या वडिलांना देऊन अवयव दानाचा वस्तुपाठ समाजापुढे ठेवणाऱ्या 22 वर्षीय जुही पवारने आज राज्यपाल चे.विद्यासागर राव यांची राज भवन येथे सदिच्छा भेट घेतली. “तू दाखविलेल्या धैर्याबद्दल आपणास तुझा अभिमान वाटतो” असे सांगतानाच हे कार्य निश्चितच प्रेरणादायी असून आता संपूर्ण महाराष्ट्रात अवयवदानाबद्दल जनजागृती करावी अशी सूचना राज्यपालांनी जुहीला केली.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जुहीची आई किरण पवार व ती वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या के.जे. सोमय्या मेडिकल कॉलेजच्या डीन डॉ. गीता नियोगी आदी उपस्थित होते.

जुहीच्या कार्याची दाखल घेऊन नुकतीच महाराष्ट्र शासनाने अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी तिची ब्रॅंड अॅम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. जुही एमबीबीएस च्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. तीन वर्षांपूर्वी जुहीने आपल्या यकृताचा 70 टक्के भाग आपले वडील डॉ. रवी पवार यांना दान केला होता. दुर्दैवाने कालांतराने किडनीसंबंधी आजारामुळे त्यांचे निधन झाले.
‘महान्यूज’ मधील मजकूर आपण ‘महान्यूज’च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.