जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा हंसराज अहिर यांनी घेतला आढावा

0
15

चंद्रपूर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी घेतला.खासदार अशोक नेते, आमदार विजय वडेट्टीवार, ॲड. संजय धोटे, प्रभारी जिल्हाधिकारी आशुतोष सलील, प्रकल्प संचालक अंकुश केदार व विविध पंचायत समितीचे सभापती तथा सदस्य यावेळी उपस्थित होते.
महात्मा गांधी, राष्ट्रीय ग्रामीण योजना, प्रधानमंत्री सडक योजना, संपूर्ण ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचेमार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजना, राजीव गांधी राष्ट्रीय ग्रामीण विद्युतीकरण योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, इंदिरा आवास योजना, मागासक्षेत्र अनुदान निधी योजना व सामाजिक आर्थिक व जातीनिहाय सर्व्हेक्षण इत्यादी योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

विजेअभावी बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना प्राधान्याने सुरु करण्याचे निर्देश यावेळी श्री. अहिर यांनी दिले. फ्लोराईडयुक्त पाणी असलेल्या गावांची यादी तयार करुन या गावात काय उपाययोजना होत आहेत, यासंबंधीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. प्रधानमंत्री जनधन योजनेत जिल्ह्यातील 100 टक्के खातेदारांचे बँक खाते उघडण्याच्या कामाचा आढावा त्यांनी या बैठकीत घेतला. बैठकीचे संचालन सहाय्यक प्रकल्प संचालक प्रीती हिरुरकर यांनी केले. बैठकीस विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.