वाघाऐवजी आता सिंह बनणार राष्ट्रीय प्राणी ?

0
15

कोलकाता- केंद्र सरकार वाघाऐवजी सिंहाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावावर विचार करत असून यामुळे वन्यप्रेमींमध्ये मात्र मोठी खळबळ माजली असून त्यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आहे
1972 सालापासून वाघाला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्यात आला आहे. झारखंडचे खासदार परिमल नाथवाणी यांनी सिंहाला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवला होता. त्यानंतर तो प्रस्ताव नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ संस्थेकडे पाठवण्यात आला. 2012 सालीही नाथवाणी यांनी सिंहाला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता, मात्र तत्कालीन पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांनी तो फेटाळून लावला होता.
सरकारने सिंहाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केल्यास देशभरात सुरू असलेल्या ‘ वाघ वाचवा ‘ या मोहिमेवरच घाला घातला जाईल, असे प्राणीसंघटनांचे म्हणणे आहे. तसेच व्याघ्र अभयारम्याच्या परिसरावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होईल अशी भीतीही पर्यावरणवाद्यांकडून व्यक्त होत आहे.