राष्ट्रपतींच्या हस्ते ‘कोर्ट’ला सुर्वणकमळ

0
9

वी दिल्ली- दिल्लीत रविवारी झालेल्या शानदार सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘कोर्ट’ला सुवर्णकमळाचा बहुमान मिळाला. तर अन्य सहा पुरस्कारांवरही मराठी चित्रपटांनी आपली मोहोर उमटवली.
या पुरस्कार सोहळ्याला अर्थमंत्री अरुण जेटली, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
‘कोर्ट’ चित्रपटाला सुवर्णकमळासोबतच चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. ‘किल्ला’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटतर ‘एलिझाबेथ एकादशी’ला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट पुरस्काराने गौरव करण्यात आला.
हिंदीमध्ये ‘क्वीन’ अभिनेत्री कंगना राणावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. तसेच ‘मेरी कोम’ या चित्रपटाला लोकप्रिय पुरस्कार दिला. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
तर मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ अभिनेते शशी कपूर यांना जुहू येथील निवासस्थानी प्रदान करण्यात येणार आहे.
62nd National Film Award‘देऊळ’ या मराठी चित्रपटाने २०१२ मध्ये सुवर्णकमळ पटकावले होते. त्यानंतर तीन वर्षांनी हे भाग्य ‘कोर्ट’ या चित्रपटाने पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीला मिळवून दिले आहे.
गौरव चित्रसृष्टीचा…
» सर्वोत्कृष्ट चित्रपट – कोर्ट
» सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – क्वीन
» सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – किल्ला
» सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कंगना राणावत(क्वीन)
» सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सुरजित मुखर्जी (चोतोष्कुन बंगाली चित्रपट)
» सर्वोत्कृष्ट अभिनेता – विजय(नंदू अवनल्ला अवलू कन्नड चित्रपट)
» लोकप्रिय चित्रपट – मेरी कोम
» विशेष उल्लेखनीय चित्रपट – किल्ला(मराठी)
» सर्वोत्कृष्ट संगीतकार – विशाल भारद्वाज(हैदर)
» सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट – एलिझाबेथ एकादशी
» सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म – मित्रा(रवी जाधव)
» सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – बलजिंदर कौर(पगडी हरयाणवी चित्रपट)
» सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – सुखविंदर सिंग(हैदर)
» सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – सैवम(तामिळ) आणि उत्तरा उन्निकृष्णन
» सर्वोत्कृष्ट वेशभूषा – डॉली आहलुवालिया(हैदर)
» सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – हैदर
» सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनक पार्श्वगायन – नाईंटीन एटी थ्री(मल्याळम)
» सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन – सुदेश बिसमिल(हैदर)