समाजकल्याण मंत्र्याची आंबेडकरी विचारवर परिक्षा सुरु

0
16

गोंदिया दि. १३ – एखाद्या राज्याचा कॅबिनेट मंत्री सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणे हातात पेन घेऊन परिक्षा केंद्रावर जाऊन चक्क पेपर सोडवतो, असे काही ऐकिवात नाही. पण महाराष्ट्रात हे घडले आहे. समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांनी चक्क दोन पेन हातात घेऊन विद्यापीठ परिसरातील परिक्षा केंद्रावर जाऊन आज बुधवारला दुसरा पेपर सोडवला. आता यात त्यांना किती मार्क मिळाले हे गुपित असले तरी त्यांच्या या कृतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बडोले हे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून निवडून गेलेले आमदार आहेत.
नागपुरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठात ‘आंबेडकरांचे विचार’ या विषयावर आज (बुधवार) पेपर घेण्यात आला. त्यासाठी चक्क समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते. पण परिक्षा केंद्रावर ते मंत्र्याच्या नव्हे तर विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसून आले.विद्यापिठाच्या प्रांगणात आल्यावर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला. तेव्हा त्यांनी पेपरला उशीर होईल, अशी सबब देऊन प्रतिनिधींना चुकविण्याचा प्रयत्न केला.बडोले परिक्षा केंद्रावर विद्याथ्यार्सारखेच आले.ही परिक्षा देण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी वेळ काढून अभ्यासही सुरु होता. पण मंत्रिपद मिळाल्याने हिवाळी परिक्षा देता आली नाही. आता ही इच्छा मला पूर्ण करायची आहे. त्यामुळे काल रात्री जागून अभ्यास केला.