राज्यात फुलपाखरांच्या २२७ प्रजाती

0
15

गोंदिया-दि.२७,कीटक प्रजातीत मोडणाऱ्या फुलपाखरांची संख्या जगभरातील १ लाख ५० हजार कीटकांपैकी १७ हजार ८२० एवढी असून, अलीकडेच फुलपाखरांचे अभ्यासक कृष्णमेघ कुंटे यांनी अरुणाचल प्रदेशात ‘बँडेड टीट’ या नवीन फुलपाखराचा शोध लावला आहे. सातपुडय़ाच्या पर्वतरांगेतही विविध प्रजातींच्या फुलपाखरांचे अस्तित्व असून, राज्य सरकारने राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेले ब्ल्यू मॉरमॉनचे (राणी फुलपाखरू) सातपुडा पर्वतरांगात वास्तव्य आढळून आले आहे.तर गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा व नवेगावबांध राष्ट्रीय अभयारण्यपरिसरासह जिल्ह्यातील वनात सुमारे 70 च्यावर विविध जातीच्या फुलपाखरुचा वावर या ठिकाणी आहे.तत्कालीन वन्यजीव उपवनसरंक राहिलेले विद्ममान वरिष्ठ अधिकारी विलास बर्ढेकर यांनी काही फुलपाखरांचा शोध नागझिरा अभयारण्यात लावला होता.
अलीकडच्या आकडेवारीनुसार भारतात १ हजार ५०२ प्रजातींची फुलपाखरे असून महाराष्ट्रात २२७ च्या घरात फुलपाखरांच्या प्रजाती आहेत. फुलपाखरांच्या पॅपीलोनीडी, निम्फॅलीडी, लायसिनीडी, परायडी आणि हेस्पिरिडी, अशी पाच कुळे आहेत. सातपुडय़ातील मेळघाटाच्या जंगलात एकूण १२७ प्रकारची फुलपाखरे आढळतात. मेळघाट, पेंच ,नागझिरा आणि संपूर्ण सातपुडा आणि त्यालगतचा परिसर फुलपाखरांच्या बाबतीत समृद्ध आहे. अनेक दुर्मिळ फुलपाखरांच्या प्रजाती या ठिकाणी दिसून येतात. सातपुडा जंगल परिसरातील फुलझाडे व इतर वनस्पतीजीवन समृद्ध असल्याने येथे फुलपाखरांची वैविध्यता मोठय़ा प्रमाणावर आहे.