राज्यभरातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
15

गोंदिया-राज्य सरकार यांनी जारी केलेल्या आदेशाने आणि पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या मान्यतेने राज्यभरातील अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.यात भारतीय पोलिस सेवेतील,राज्य पोलिस सेवेतील उच्च अधिकारी,पोलिस निरीक्षक आणि उप निरीक्षकांचा समावेश आहे. या मोठ्या अधिकाऱ्यासह एकूण ४६ पोलिस निरीक्षकांना बदल्या देण्यात आल्या आहेत.  एकूण २० सहायक पोलिस निरीक्षकांना बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सोबतच १६ पोलिस उप निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी झाले आहेत

महाराष्ट्र सरकारने राज्यात कार्यरत काही सहायक पोलिस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात नांदेडच्या भोकर विभागात कार्यरत सहायक पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांना अपर पोलिस अधीक्षक खामगाव जिल्हा बुलढाणा येथे पाठवण्यात आले आहे. दीक्षितकुमार गेडाम या सहायक पोलिस अधीक्षक जालना येथून अपर पोलिस अधीक्षक अंबेजोगाई जिल्हा बीड येथे जात आहेत.कृष्णकांत उपाध्याय हे सोलापूर ते अपर पोलिस अधीक्षक सांगली अशी नवीन नियुक्ती देण्यात आली आहे.प्रवीण मुंढे हे सहायक पोलिस अधीक्षक नासिक ग्रामीण ते अपर पोलिस अधीक्षक भंडारा येथे नियुक्ती करण्यात आले आहेत.राजा रामसामी हे रेल्वे अमरावती ते चाळीसगाव येथे जात आहेत. तेजस्विनी सातपुते ह्या सहायक पोलिस अधीक्षक जालना जिल्ह्यात परतूर उप विभागातून पुणे गुन्हे अन्वेषण विभागात जात आहेत.सुहेल शर्मा हे मेहकर उप विभाग येथून अपर पोलिस अधीक्षक नांदेड येथे नियुक्त करण्यात आले आहेत.राकेश ओला हे उप विभाग श्रीरामपूर येथून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.एम.सी.व्ही.महेश्वर रेड्डी रायगड येथून अपर पोलिस अधीक्षक अहेरी जिल्हा गडचिरोली येथे जाणार आहेत. गौरव सिंह हे राज्यपाल यांचे सहायक झाले आहेत.पी.पी.शेवाळे हे नागरी हक्क संरक्षण येथून ठाणे शहरात जात आहेत.सुधीर हिरेमठ हे पुणे येथून पुणे शहरात परिमंडळ बदलून नियुक्त करण्यात आले आहेत. 
राज्य सेवेतील पोलिस अधीक्षक आणि अपर पोलिस अधीक्षक असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यात मारोती कराडे हे अपर पोलिस अधीक्षक अंबेजोगाई येथून पोलिस उप आयुक्त नागरी हक्क संरक्षण येथे जात आहेत.व्ही.यू.जाधव ठाणे शहरातून समादेशक नागपूर राखीव पोलिस दल येथे जात आहेत.तुषार दोषी पुणे शहरातून अपर पोलिस आयुक्त पुणे शहर येथे पाठवण्यात आले आहे.यशवंत सोळंके हे अपर पोलिस अधीक्षक खामगाव येथून समादेशक राज्य राखीव गट जालना येथे जाणार आहेत.सुनील प्रतापराव अपर पोलिस अधीक्षक अहेरी हे आता नागरी हक्क संरक्षण या विभागात जात आहेत.कल्पना बारावकर ह्या भंडारा येथून पोलिस उप आयुक्त पुणे शहर येथे जाणार आहेत.संजय सुरगोंडा पाटील यांना रायगड येथे जाणार आहेत.लक्ष्मीकांत पाटील हे सांगली येथून मुंबईला जात आहेत.