विदर्भ एक्सप्रेसचे जल्लोषात तिरोडा स्थानकावर स्वागत

0
7

तिरोडा -रेल्वे स्थानकावर विदर्भ एक्स्प्रेस थांबावी, ही तिरोडावासीयांची अनेक दिवसांपासूनची मागणी आज शुक्रवारला पूर्णत्वास आली.नागपूरवरुन तिरोडा स्थानकावर विदर्भ एक्स्प्रेसचे आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले.गोंदियाकडे रेल्वेला रवानाकरतेवेळी खा.पटोले आणि आमदार रहागंडाले यांच्यासह रेल्वेच्या अधिकायानी हिरवी झेंडी दाखवून गाडीला रवाना केले.

यावेळी गोंदिया भंडारा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले,तिरोडाचे आमदार विजय रहागंडाले,रेल्वेचे वाणिज्य मंडल प्रबंधक अर्जुन सिब्बल,यांच्यासह रेल्वे कमिटी सदस्य निलम हलमारे,उमाकांत हारोडे,भाऊराव कठाणे,बाजार समितीचे प्रशासक चिंतामण रहागंडाले,डाॅ.वसंत भगत,संजयसिह बैस,गणेश बघेले,स्वानंद पारधी,पिटू रहागंडाले,मदन पटले,श्रीराम उत्सव समितीचे  पदाधिकारी यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.