35 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
14
मुंबई- राज्य पोलिस दलातील उपायुक्त दर्जाच्या 69 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी (ता. 11) गृह विभागाने काढले. मुंबई पोलिस दलातील सहा अधिकाऱ्यांची मुंबईबाहेर बदली झाली आहे. गुन्हे शाखेचे धनंजय कुलकर्णी यांची राज्य दहशतवाद विरोधी पथकात, तर परिमंडळ-5 चे महेश पाटील यांची ठाणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक पदावर नियुक्ती झाली आहे. नाशिकच्या एन. अंबिका, सोलापूरच्या अश्‍विनी सानप यांची मुंबई पोलिस दलात नेमणूक झाली.
राज्यातील पोलिस अधीक्षक, उपायुक्त दर्जाच्या 35 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचे आदेश गृह विभागाने बुधवारी काढले. औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांची नागपूरच्या उपायुक्तपदी, नगरचे अधीक्षक पंकज देशमुख यांची उस्मानाबादला, मुंबई एसआरपीचे समादेशक अशोक मोराळेंची हिंगोलीच्या पोलिस अधीक्षकपदी बदली झाली आहे.
गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक शशीकुमार मीणा यांची बदली केली आहे.मीणा यांच्याविरुध्द पोलीस प्रशासनातच नव्हे तर राजकीय नेत्यामध्ये सुध्दा चांगलीच नाराजी होती.त्यांच्या जागेवर सांगली येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य दिलीप भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सिंहस्थापूर्वी म्हणजे अवघ्या दीड वर्षापूर्वी नाशिकला अालेल्या परिमंडळच्या पाेलिस उपायुक्त एन. अंबिका यांची बृहन्मुंबईत उपायुक्तपदी बदली झाली अाहे. त्यांच्या जागी मुंबईतील दहशतवादविराेधी पथकातील अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची नियुक्ती झाली अाहे. राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त डी. पी. प्रधान हे नाशिकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून बदलून येत अाहेत. श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश आलेला यांची मालेगावच्या अपर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली अाहे. नाशिकचे उपायुक्त अविनाश बारगळ यांची भाेकर येथे अपर पाेलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात अाली अाहे.