आगीत लाखोंच नुकसान

0
7

पवनी दि. १२ – तालुक्यात मध्यरात्री शहरातील एका कारखान्याला आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे, शहरातील बजरंग वार्डात अतुल बावनकर यांचा प्लास्टिक जुना बारदाना शिवून विकण्याचा कारखाना आहे. काल मध्य रात्री शॉट सर्किट झाल्यामुळे अचानक कारखान्याला आग लागली, आग लागल्याचे लक्षात येताच लोकांनी स्वत:च्या घराच्या बोरवेल पंप सुरु करून आग विझविण्याचे काम केले. ३ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले, मात्र या आगीत जवळपास १५ लाखांचा नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.