२४ जून रोजी होणार गोंदिया जि.प.मधील भाजप काँग्रेस युतीचा निर्णय

0
7

गोंदिया-जुर्ले २०१५ मध्ये जिल्हा परिषदेत काँग्रेससोबत युती करुन सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाने मात्र वर्षभरानंतर काँग्रेससोबतची जिल्हा परिषदेतील युती तोडण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा मार्गावर आली आहे.आज येथील विश्रामगृहात भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात सुतोवाच करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जि.प.मधील काँग्रेससोबतची युती तोडण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा भाजपला दिल्याचे सांगितले.त्यानुसार येत्या २४ जून रोजी अर्जुनी मोरगाव येथे आयोजित गोंदिया जिल्हा भाजपच्या जिल्हा बैठकीत गोंदिया जिल्हा परिषदेतील युतीसह ,सालेकसा,आमगाव,सडक अर्जुनी येथील पंचायत समितीमध्ये झालेल्या सभापतीपदाच्या युतीवरही निर्णय घेतला जाणार आहे.या बैठकिला विशेष महत्व असल्याने भाजपचे सक्रीय कार्यकारिणी सदस्य असलेल्या दोन हजार सदस्यांनाही या निर्णयात सहभागी केले जाणार आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये भाजपने या आधी सुध्दा काँग्रेससोबत राहून सत्तेचा उपभोग घेतला आहे.परंतु २०१५ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर अध्यक्षपद आपणास मिळणार नाही हे हेरून काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत युती न करता भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी काँग्रेसच्यावतीने तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्ष,पालकमंत्री यांच्यामार्फेत भाजपच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन युतीचा निर्णय घेतला गेला.परंतु हाच निर्णय आपल्याला अवजड होईल याची जाणीव भाजपला नगरपंचायत निवडणुकीत झाली.तेव्हापासून युती संदर्भात चर्चा सुरु होत्या.परंतु ९ एप्रिलरोजी गोंदिया नगरपरिषदेचे स्विकृत सदस्य शिव शर्मा यांनी काँग्रेसचे गोंदिया जिल्ह्याचे सर्वेसर्वा असलेले आमदार गोपालदास अग्रवाल यांना मारहाण केली.भाजपच्या नगरसेवकांनी काँग्रेस आमदाराला मारहाण केली हा विषय राजकीय पातळीवर चर्चेत आल्यानंतर खासदार पटोले यांंनी गोंदियात येऊन घटनेच्या आठ दहा दिवसानंतर गोंदिया जिल्हा परिषदेतील भाजप काँग्रेस युतीसंदर्भात पक्ष येत्या महिन्याभरात निर्णय घेणार असल्याचे जाहिर केले होते.त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर मुंबईत भाजपच्या जिल्हा पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.त्या चर्चेमध्ये मुख्यमंत्री यांनी युती तोडण्यासंदर्भातला निर्णय जिल्हा भाजपला स्थानिक पातळीवर घेण्यासंबधी अधिकार दिले होते.त्यानुसार येत्या २४ जून रोजी जिल्हा भाजपच्या होणाèया बैठकित यावर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती खा.नाना पटोले यांनी दिली.यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,शहर अध्यक्ष सुनिल केलनका,युवा मोर्चा अद्यक्ष पंकज रहागंडाले,रविकांत बोपचे,जिल्हा महिला अध्यक्ष भावना कदम,ऋqषकात शाहू,विरेंद्र जायस्वाल,अशोक चांडक,जयंत मुरकूटे कुशल अग्रवाल,ओबीसी आगाडी जिल्हाध्यक्ष अमित बुध्दे,गुड्डू कारडा,मिलन हलमारे,त्र्यबंक जरोदे, आदी उपस्थित होते.

दरम्यान खा.पटोले यांनी आपण सबंधीत युतीच्या विरोधात आधीपासूनच असल्याचे त्यांनी स्पष्ट करीत पुढच्या बैठकीत नक्कीच चांगला निर्णय येईल आणि भाजप पुढच्या सर्व निवडणुका स्वबळावरच लढू असे सांगितले.जिल्हा परिषदेतील सध्याचे बलाबल बघितल्यास राष्ट्रवादी काँग्रेस 19,भाजप 16 व काँग्रेस 16 अशी आहे.53 सदस्य असलेल्या जि.प.मध्ये राष्ट्रवादी व भाजपच्या प्रत्येकी 1 सदस्याचे सदस्यत्व रद्द झाल्याने सध्या 51 सदस्य संख्या आहे.उद्या चालून भाजपने रााजीनामा दिल्यास भाजपच्या तीन जागेवर निवडणुक झाल्यास राष्ट्रवादीचे सदस्य पदाधिकारी म्हणून निवडून जाऊ शकतात.परंतु राष्ट्रवादी अधिक संख्या राहूनही अध्यक्षपद सोडेल का याकडेही लक्ष लागले आहे.